Join us  

दिशा पटानी १२ वर्षे मोठ्या प्रभासला करतेय डेट? हातावरील टॅटूमुळे अफेयरच्या चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 11:01 AM

Disha Patani And Prabhas : दिशा पटानी आणि प्रभास नुकतेच 'कल्की 2898 एडी'मध्ये एकत्र दिसले होते. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनाही आवडली. पण आता दिशा पटानीच्या नव्या टॅटूने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आता तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. २०१५ साली तिने 'लोफर' या तमीळ चित्रपटातून पदार्पण केले होते. यानंतर, ती 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या हिंदी चित्रपटात दिसली, ज्यातून तिला प्रचंड ओळख मिळाली. दिशा प्रोफेशनल लाइफ व्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी अनेकदा चर्चेत असते. अभिनेत्री याआधी टायगर श्रॉफ(Tiger Shroff)सोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि काही काळापूर्वी दोघांचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जाते.

'इन्स्टंट बॉलिवूड'ने शेअर केलेल्या अलिकडील पोस्टमध्ये, दिशा पटानी लो वेस्ट व्हाईट जॉगर्स आणि ग्रे टँक टॉपमध्ये अत्यंत हॉट दिसत आहे. त्यावर केस मोकळे सोडून दिशाने कमी मेकअपमध्ये तिचा लूक पूर्ण केला. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अभिनेत्रीच्या हातावर असलेल्या नवीन टॅटूने. ज्यावर 'पीडी' लिहिलेले होते.

दिशा पटानीचा टॅटू तर, दिशा पटानी एक अशी अभिनेत्री आहे जिचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत असते. पुन्हा एकदा, दिशाने तिच्या नवीन टॅटूची झलक शेअर करताच, तिच्या चाहत्यांनी तिच्या नवीन नात्याबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे आणि सुरुवातीचे अक्षर 'पी'बद्दल आश्चर्य वाटू लागले आहे, ते म्हणत आहेत की याचा अर्थ प्रभास आहे. दिशाने अलीकडेच 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात प्रभाससोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीशिवाय, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रभास आणि दिशाचे ऑफ-स्क्रीन फोटोही व्हायरल झाले होते. 

लोकांनी जोडली दोघांची नावे या पोस्टमधीस कमेंट बॉक्समध्ये, दिशा पटानीच्या अनेक चाहत्यांनी तिच्या नवीन टॅटूबद्दल त्यांचे मत शेअर केले. त्यांच्यापैकी काहींनी म्हटले की PD हे तिच्या स्वतःच्या नावाचं उलटं केलेलं असू शकतं, तर काहींनी आद्याक्षरे प्रभास आणि दिशा यांच्यासाठी आहेत. मात्र, यावर अद्याप दिशा आणि प्रभासने कोणताही खुलासा केलेला नाही.

टॅग्स :दिशा पाटनीप्रभास