Join us

Kareena Kapoor : बॉलिवूडची ‘बेगम’ करीना कपूर खान तिसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो पाहून फॅन्स कन्फ्युज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 10:57 AM

Kareena Kapoor Khan is pregnant for the third time? सैफ व करिनाच्या लंडन व्हॅकेशनदरम्यानच्या एका फोटोमुळे बेबो प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

Kareena Kapoor Khan is pregnant for the third time? बॉलिवूडची ‘बेगम’ करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan ) सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्टयांचा आनंद घेत आहे. बेबोचा पती सैफ अली खान ( Saif Ali Khan) शिवाय दोन्ही मुलं तैमूर  व जेह हे सुद्धा तिच्यासोबत आहेत. या स्टार कपलच्या लंडन व्हॅकेशनचे एक ना अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि अशात आता हे फोटो व्हायरल झाल्यावर एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलं आहे. होय, करिना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा जोरात आहे.सैफ व करिनाच्या लंडन व्हॅकेशनदरम्यानच्या एका फोटोमुळे बेबो प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या  फोटोमध्ये करीनाचा बेबी बम्प दिसत आहे. या फोटोवरून करीना पुन्हा एकदा गरोदर असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. फॅन्स कन्फ्युज आहेत.

व्हायरल फोटोमध्ये करिना ब्लॅक कलरच्या टॉपमध्ये आहे. तिने स्लिंग बॅग कॅरी केली आहे. न्यूड मेकअप व हाफ टाय हेअरमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. पण या फोटोत करिनाचा बेबी बम्प स्पष्ट दिसतोय. ब्लॅक टॉपने ती बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न करतेय. या फोटोनं बेबोच्या चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे. बेबो तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे का? असा सवाल चाहते करत आहेत. काही चाहत्यांच्या मते, बेबोचा हा फोटो जुना आहे.

मात्र यावर करीना किंवा तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण अनेक युजर्स करिना तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचा दावा करत आहेत. कारण करिनाने लंडन व्हॅकेशनचे जितके काही फोटो शेअर केले आहेत, त्या सर्व फोटोंमध्ये ती बेबी बम्प लपवताना दिसते आहे.  

सर्वच फोटोमध्ये करीना कुठेतरी मागे उभी असलेली किंवा सैल कपडे घातलेली किंवा पोट लपवताना दिसत आहे.  आता खरं काय, हे तर करिनाच सांगू शकते. करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं असेल तर ती लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान करिश्मा कपूरबॉलिवूड