Join us

शाहरुखच्या गाण्यांवर अंबानी कुटुंबाने केला धमाकेदार डान्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 14:40 IST

सध्या प्रत्येकाच्या नजरा मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नावर खिळल्या आहेत. हे लग्न यंदाचे सगळ्यात हायप्रोफाईल लग्न आहे.

ठळक मुद्देया लग्नाचे प्री वेडिंग सेलिब्रेशन सुरु झालेय. काल उदयपूर येथे ईशा अंबानीची संगीत सेरेमनी पार पडली. या संगीत सेरेमनीत अंबानी कुटुंबाने शानदार परफॉर्मन्स दिलेत.

सध्या प्रत्येकाच्या नजरा मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नावर खिळल्या आहेत. हे लग्न यंदाचे सगळ्यात हायप्रोफाईल लग्न आहे. देशविदेशातील पाहुणे या लग्नात सामील होत आहेत. बॉलिवूड स्टार्सनेही या लग्नाच्या सेलिब्रेशनला ‘चार चांद’ लावले आहेत.या लग्नाचे प्री वेडिंग सेलिब्रेशन सुरु झालेय. काल उदयपूर येथे ईशा अंबानीची संगीत सेरेमनी पार पडली. या संगीत सेरेमनीत अंबानी कुटुंबाने शानदार परफॉर्मन्स दिलेत. ईशानेही तिचा होणारा पती आनंद पिरामलसोबत अतिशय रोमॅन्टिक डान्स केला. शाहरूख खानच्या ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटातील ‘मितवा’ या गाण्यावर दोघांनीही ताल धरला. ईशा व आनंदच्या संगीत सेरेमनीतील या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

  सेरेमनीसाठी बॉलिवूड सेलेब्सनी हजेरी लावली आहे. एवढेच नाही तर देश-विदेशातील प्रमुख पाहुणे देखील उदयपूरमध्ये पोहोचले आहेत. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांचेही उदरपूरमध्ये आगमण झाले आहे.

ईशा आणि आनंद यांच्या प्री- वेडींग सेरेमनीसाठी शाहरूख खान, गौरी खान, सलमान खान, कटरीना कैफ, जान्हवी कपूर, अनिल कपूर, अमिर खान, करण जोहर, जॅकलिन, आलिया भट्ट, रेखा, प्रियांका चोप्रा, निक जोनास आदी सेलेब्स पोहोचले आहेत. ईशा अंबानी आपला मित्र आनंद पिरामल यांच्यासोबत 12 डिसेंबर रोजी आपली लग्नगाठ बांधणार आहे. आनंद आणि  ईशा जुने मित्र आहेत.

आनंदने महाबळेश्वरच्या मंदिरात ईशासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.  आनंदने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून सध्या तो पिरामल इंटरप्रायजेसचा कार्यकारी संचालक आहे. त्याने पेन्सिलवेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. हार्वर्डमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने दोन स्टार्टअप सुरू केले.  

 

टॅग्स :ईशा अंबानी आणि आनंद पिरामलमुकेश अंबानीईशा अंबानी