Join us

ईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 17:45 IST

अभिनेत्री ईशा देओल पुन्हा एकदा गुड न्यूज देणार आहे. ही गुड न्यूज काय असेल, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... ईशा दुसऱ्यांदा आई होणार आहे.

ठळक मुद्देईशा दुसऱ्यांदा होणार आई

अभिनेत्री ईशा देओल पुन्हा एकदा गुड न्यूज देणार आहे. ही गुड न्यूज काय असेल, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... ईशा दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. ईशा २०१२ मध्ये भरत तख्तानीसोबत विवाहबंधनात अडकली आणि त्यांना एक मुलगी आहे.

ईशा बऱ्याच कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे. काही वर्षांपूर्वी ईशा मुंबईस्थित व्यावसायिक भरत तख्तानीसोबत लग्नबेडीत अडकली. ईशाला एक वर्षांची राध्या नावाची छोटी मुलगी आहे. ईशाने राध्याचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. मी लवकरच ताई होणार आहे अशी ओळ लिहित इशाने ही आनंदाची बातमी दिली आहे.

इशा ‘कॅटवॉक’ या शेवटच्या लघुपटात दिसली होती. यात ईशा शेफच्या भूमिकेत झळकली होती.

'केकवॉक'चे आभ्रा चक्रवर्तीने सहदिग्दर्शन केले असून दिनेश गुप्ता, शेलेंद्र कुमार व अरित्रा दासने निर्मिती केली आहे. हा लघुपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या लघुपटात ईशा देओलसोबत छोट्या पडद्यावरील अभिनेता तरूण मल्होत्रा व अभिनेत्री अनिंदता चॅटर्जी दिसणार आहेत. ईशा देओल २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला 'किल देम यंग' चित्रपटात झळकली होती. 

टॅग्स :इशा देओल