ईशा गुप्ता होणार एन्गेज्ड! विश्वास बसत नसेल तर ईशाची ‘ही’ पोस्ट वाचाच!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 05:28 AM2018-03-26T05:28:37+5:302018-03-26T10:58:37+5:30
सध्या बॉलिवूडमध्ये वेडिंग सीझन सुरु आहे. या वेडिंग सीझनमध्ये बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री हात पिवळे करण्याच्या तयारीत आहे. होय, ...
स ्या बॉलिवूडमध्ये वेडिंग सीझन सुरु आहे. या वेडिंग सीझनमध्ये बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री हात पिवळे करण्याच्या तयारीत आहे. होय, बॉलिवूडची बोल्ड अॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री ईशा गुप्ता लवकरच साखरपुडा करू शकते. खुद्द ईशाने याबाबतचे संकेत दिले आहेत. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत तिने याबद्दल सूचक भाष्य केले आहे. आता ईशा कुणासोबत साखरपुडा करणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता तर असेलच. तर त्याचे नाव आहे, निखिल थम्पी. निखिल पेशाने फॅशन डिझाईनर आहे. निखिलसोबतचा एक फोटो पोस्ट करून ईशाने एक पोस्ट शेअर केली आहे. ‘निखिल, मी तयार आहे....’, असे तिने लिहिले आहे आणि सोबत अंगठीचा इमोटिकॉन बनवला आहे. तिची ही पोस्ट बरीच काही सांगणारी आहे.
ईशाने काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेन्ड निखिलची सोशल मीडियावर ओळख करून दिली होती. ईशा गेल्या काही वर्षांपासून निखिलने तयार केलेले क्रिएशन वापरताना दिसतेय. आधी दोघांची मैत्री झाली आणि पुढे प्रेम. अर्थात ईशाने या प्रेमाची कुणाला खबर लागू दिली नाही. पण आता कदाचित योग्य वेळ आली आहे. ईशाची ताजी पोस्ट हेच सांगणारे आहे. तूर्तास ईशा व निखिलचा साखरपुडा कधी होणार, हे उघड झालेले नाही. पण त्याची बातमीही लवकरच मिळेल, अशी आशा करूयात. तोपर्यंत धीर धरायला हवाचं.
मध्यंतरी ईशा अली रजा बेग या १८ वर्षांच्या तरूणाला डेट करत असल्याची चर्चा होती. अर्थात ही चर्चा रंगण्यामागेही कारण होते. Happy 18th to my one n only. My baby boy I love you the most, please always stay this happy child that you are. I’ve always got your back, असे अलीच्या १८ व्या बर्थ डेला विश करताना ईशाने लिहिले लिहिले होते. यावरून ईशा ट्रोलही झाली होती. यावर ट्रोलर्सला उत्तर देताना, ये मेरा बेबी है, बॉयफ्रेन्ड नहीं. आप लोगों की मानसिकता ही बीमार है, असे ईशाने लिहिले होते.
ALSO READ : ईशा गुप्ताच्या ओठांना एका रात्रीत झाले तरी काय? ओळखणेही झाले कठीण!!