Join us

​ इशा गुप्ता अन् रेड स्वीमसूट! पाहा, आणखी एक हॉट फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2017 9:59 AM

काल परवा इशा गुप्ताने बिकनी फोटो शेअर करून आपल्या चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन केले.आता इशाने एक नवा फोटो सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे.

काल परवा इशा गुप्ताने बिकनी फोटो शेअर करून आपल्या चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन केले. तिचा तो बिकनीतील हॉट फोटो तुम्ही पाहिलाच. त्याआधीचे इशाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले न्यूड, सेमी न्यूड असे अतिशय बोल्ड फोटोही तुुुम्ही पाहिलेत. शिवाय या फोटोंमुळे इशाला कसे ट्रोल व्हावे लागले, तेही वाचले. आता इशाने एक नवा फोटो सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे.यात इशा रेड कलरच्या स्वीमसूटमध्ये दिसलेय. आता या स्वीमसूटमध्ये इशा किती सेक्सी आणि हॉट दिसतेय, हे तुम्ही स्वत:च ठरवायला हवे. कदाचित याचमुळे  चाहत्यांनी तिला ‘वंडर वूमन आॅफ इंडिया’ हा किताब दिला आहे. बॉलिवूडची अँजेलिना जोली म्हणून ओळखल्या जाणा-या इशाच्या या फोटोवर चाहत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्यात, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. ALSO READ : दोन आठवड्यानंतर इशा गुप्ताने पुन्हा शेअर केला अतिशय बोल्ड फोटो !अलीकडे इशाने इंडस्ट्रीतील ‘सो कॉल्ड’ लोकांवरची नाराजी बोलून दाखवली होती. मला आजही इंडस्ट्रीतील अनेकांकडून आऊटसाईडर म्हणून वागवले जाते, असे ती म्हणाली होती. मी बॉलिवूडमध्ये आले, तेव्हाच हा प्रवास सोपा नाही, हे मला कळून चुकले होते. कदाचित माझे आडनाव गुप्ता ऐवजी वेगळे असते (मोठ्या स्टारकिड्सला उद्देशून) तर हा प्रवास इतका कठीण झाला नसता. एकापाठोपाठ एक चार सिनेमे फ्लॉप झाल्यानंतरही एखाद्या बड्या निर्मात्याने माझा चित्रपट प्रोड्यूस करावा, असे मला अनेकदा वाटते. पण गुप्ता आडनाव असल्याने ते शक्य नाही, ही जाणीव मला करून दिली जाते. बॉलिवूडमधील लोक सतत त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून मी आऊटसाईडर आहे, हे मला सांगत असतात, अशा शब्दांत तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली होती.