कंगना रानौतने नाकारला इशान खट्टरचा डेब्यू चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2017 4:47 PM
बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आपल्या चित्रपटात काम करावे असे बहुतेक दिग्दर्शकांना वाटते. दुसरीकडे कंगना ...
बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आपल्या चित्रपटात काम करावे असे बहुतेक दिग्दर्शकांना वाटते. दुसरीकडे कंगना रानौतही आपण कोणत्याच दिग्दर्शकांना नकार देऊ शकत नाही, असे सांगते. मात्र आता तिने शहिद कपूरचा भाऊ इशान खट्टरच्या डेब्यू चित्रपटात भूमिका करण्यास नकार दिला असल्याची चर्चा आहे. इरानी दिग्दर्शक माजिद मजीदी याच्या आगामी चित्रपट ‘बियाँड द क्लाऊड’ या चित्रपटातून शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर याला लाँच करण्याची तयारी करीत आहे. या चित्रपटात फिमेल लीड रोलसाठी कंगना रानौतची निवड केली होती. या चित्रपटाची कथा माजिद मजीदी याने तोंडी कंगनाला सांगितली होती. या चित्रपटाला कंगनाने होकारही कळविला होता. यानंतर या चित्रपटाची शूटिंग डेट्स फिक्स करण्यात आल्या. कंगनाचे ड्रेस देखील तयार करण्यात आले. Read More : कंगना राणौतचा फनी अंदाज पाहून तुम्ही पडाल प्रेमात! मात्र, शूटिंग सुरू होण्याआधी अचानक कंगनाने स्क्रिप्ट वाचण्याची अट घातली. निर्मात्यांना होकार दिला असल्याने तिला स्क्रिप्ट वाचण्यास देण्यातही आली. मात्र त्यानंतर कंगनाने या चित्रपटाला आपला नकार कळविला. मिळालेल्या माहितीनुसार‘बियाँड द क्लाऊड’ या चित्रपटात जरी कंगनाची नायिकेची भूमिका असली तरी त्या भूमिकेत ती बहिणीच्या रूपात दिसणार होती. ईशान खट्टरच्या बहिणीची भूमिका ती साकारणार होती. हा चित्रपट भाऊ बहिणीच्या कथेवर आधारित होता. यामुळे कंगनाने या चित्रपटाला आपला नकार कळविला. कंगनाच्या मते ती सध्या अशा पोझिशनवर आहे, जिथे बहिणीची भूमिका साकारणे तिच्यासाठी योग्य नाही. आता माजीदने नव्या अभिनेत्रीचा शोध घेणे सुरू केले आहे. मात्र कं गनाने नकार दिल्यावर ही भूमिका कोण साकारेल हा देखील त्याच्यासमोर मोठा प्रश्न आहे. Read More : म्हणून शहिद कपूरची पत्नी मीरा राजपूरतने रिलीजच्या आधीच पाहिला ‘रंगून’ कंगना रानौतचा हिची प्रमुख भूमिका असलेला विशाल भारद्वाज दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रंगून’ लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ती शाहिद कपूर व सैफ अली खानच्या अपोझिट दिसणार आहे. हा चित्रपट कंगनाच्या करिअरसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. ALSO READ : शाहिद कपूर म्हणतो, कंगना राणौत सोबत माझे मतभेद नाहीत!कंगना रानौत म्हणते, मी प्रतिकार केला म्हणूनच विजेती ठरेल