Join us

‘धडक’च्या त्या गाण्याबद्दल इतक्या दिवसानंतर झाला खुलासा! जान्हवी-ईशानची उडाली भीतीने गाळण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 20:17 IST

अलीकडे ईशानने आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. यात तो ‘धडक’च्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पहिली बार...’ या गाण्याच्या मेकिंगबद्दल बोलतोय.

‘धडक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाबद्दल जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि चित्रपटाचा दिग्दर्शक शशांक खेतान सगळेच कमालीची उत्सूक आहेत. त्यांचा हा उत्साह त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमधूनही दिसतोय. अलीकडे ईशानने आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. यात तो ‘धडक’च्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पहिली बार...’ या गाण्याच्या मेकिंगबद्दल बोलतोय. या गाण्यात ईशान तलावात उडी घेताना दिसतो. नेमक्या या सीनबदद्ल ईशान शशांकशी बोलतोय. पण बोलण्याच्या ओघात शशांक अचानक अशी काही गोष्ट सांगतो की, ती ऐकून ईशान व जान्हवी दोघांनाही मोठा धक्का बसतो. कारण, ती भयावह गोष्ट ईशान व जान्हवीपासून जाणीवपूर्वक लपवली गेलेली असते़.

होय, ज्या तलावात ‘पहिली बार’चे शूटींग झाले. त्या तलावात अनेक साप होते. खुद्द शशांक व्हिडिओत हे सांगतोय. तो सांगतोय की, शूटींगच्या आदल्यादिवशी आम्ही तलावाजवळ गेलो. तेव्हा तिथे असलेल्या व्यक्तिने या तलावात खूप साप असल्याचे आम्हाला सांगितले. मला मात्र त्याच्यावर विश्वास बसला नाही. पण अचानक एक साप आमच्यासमोर आला अन् चक्क फणा काढून बसला.

शशांक हे हसत हसत सांगतोय आणि इकडे जान्हवी आणि ईशानची भीतीने गाळण उडताना व्हिडिओत स्पष्ट दिसतेय. तू आम्हाला तेव्हा का सांगितले नाही, असा त्यांचा सवाल आहे. अर्थात आता त्या प्रश्नाला अर्थचं नाही. कारण ‘धडक’चे ते गाणे शूट झालेय आणि शशांकच्या मनासारखे शूट झालेय. शेवटी हेच तर शशांकला हवे होते.

 

 

 

टॅग्स :धडक चित्रपट