Join us

'इश्क'मध्ये काजोलच्या कडेवर असलेल्या चिमुकलीला ओळखलंत का? आज आहे लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:59 IST

चिमुकली आता ३३ वर्षांची असून तिच्या पहिल्याच सिनेमाने ३०० कोटी पार कमाई केली आहे. कोण आहे ती?

अजय देवगण, काजोल, आमिर खान आणि जुही चावला 'इश्क' (Ishq) सिनेमा आठवतोय? १९९७ साली आलेला हा सिनेमा आजही पाहिला तरी खळखळून हसू येतं. सिनेमात अजय-काजोल आणि आमिर-जुहीची जोडी होती. कॉमेडी आणि रोमान्स अशा दोन्ही गोष्टी सिनेमात होत्या. याच सिनेमातला एक सीन आहे ज्यामध्ये काजोल (Kajol) काही छोट्या मुलांसोबत खेळत असते. यात तिच्या कडेवर गुलाबी ड्रेस घातलेली चिमुकली आहे. ती चिमुकली आज बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री आहे. कोण आहे ती?

मनोरंजनविश्वात सध्याच्या अनेक आघाडीच्या कलाकारांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केलं आहे. अगदी आलिया भटनेही 'संघर्ष' सिनेमात छोट्या मुलीची भूमिका साकारली होती. 'इश्क' सिनेमातला हा फोटो व्हायरल होतोय. यामध्ये काजोलच्या कडेवर असलेल्या चिमुकलीला ओळखलंत का? गुलाबी फ्रॉकमधली ही मुलगी आहे ३३ वर्षीय अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh). होय, तिने 'इश्क' सिनेमासोबतच 'चाची ४२०','वन टू का फोर' या सिनेमांमध्येही बालकलाकार म्हणून काम केलं आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये तिने हा खुलासा केला. 

'इश्क' मधल्या या चिमुकलीने नंतर हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात गाजलेला सिनेमा केला तो म्हणजे 'दंगल'. आमिरच्या 'दंगल' सिनेमात तिने गीता फोगाटची भूमिका साकारली जी खूप गाजली. आजही फातिमाला 'दंगल' मुळेच ओळखलं जातं. दंगलने ३०० कोटी पार कमाई केली होती. तर जगभरात सिनेमाने २००० कोटी कमावले आहेत. फातिमा नंतर 'लुडो','ठग्स ऑफ हिंदुस्तान','थार','धक धक' या सिनेमांमध्येही दिसली.

टॅग्स :काजोलफातिमा सना शेखबॉलिवूड