Join us

Ishq Vishk Rebound : हृतिक रोशनच्या बहिणीची बॉलिवूडमध्ये 'एन्ट्री', पहिल्याच सिनेमात दिले लिपलॉक 'Kissing सीन्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 9:42 AM

पश्मिना रोशन सोशल मीडियावर कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

रोशन कुटुंबातील आणखी एक सदस्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनची बहीण बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. पश्मिना रोशन ही 'इश्क विश्क रिबाउंड' या चित्रपटातून बॉलिवूड एन्ट्री करणार आहे. तिच्या पहिल्या-वहिल्या बॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून या सिनेमात तिनं दिलेल्या लिपलॉक सीनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लाखो तरुणींचा क्रश असलेला अभिनेता रोहित सराफसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

पश्मिना रोशन ही हृतिक रोशन याची चुलत बहीण आहे. आपल्या भावाप्रमाणेच पश्मिना बॉलिवूडमध्ये नाव कमावण्साठी सज्ज झाली आहे.'इश्क विश्क रिबाउंड' सिनेमात ती  'सान्या' हे पात्र साकारताना पाहायला मिळणार आहे. पश्मिना आणि रोहित यांची केमिस्ट्री सिनेमातील गाण्यांसह ट्रेलरमध्येही पाहायला मिळाली. त्यामुळे आता मोठ्या पडद्यावर त्या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

'इश्क विश्क रिबाउंड' हा सिनेमा २००३ साली आलेल्या अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव यांच्या 'इश्क विश्क' या सिनेमाचा सीक्वेल आहे. हा  सिनेमा येत्या २१ जून २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक निपुण अविनाश धर्माधिकारीने केले आहे. 

पश्मिना रोशन सोशल मीडियावर कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. तिच्या बोल्डनेसपुढे प्रसिद्ध अभिनेत्री देखील फिक्या आहेत. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पश्मिरा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता ती सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने तिचे चाहते भलतेच खूश आहेत.  आता आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमात लिपलॉक सीन दिला आहे. आता तिचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना कितपत आवडतो हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच समजणार आहे. 

टॅग्स :हृतिक रोशनसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा