Join us

​अॅनिमेशन चित्रपटाचे दिग्दर्शन करणे खूपच कठीण ः रुची नरेन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2017 12:26 PM

दिग्दर्शक रुची नरेनने हजारो ख्बाइशे ऐसी या चित्रपटाची कथा लिहिली होती. लेखनानंतर ती दिग्दर्शनाकडे वळली. हनुमानावर आधारित हनुमान दा ...

दिग्दर्शक रुची नरेनने हजारो ख्बाइशे ऐसी या चित्रपटाची कथा लिहिली होती. लेखनानंतर ती दिग्दर्शनाकडे वळली. हनुमानावर आधारित हनुमान दा दामदार अॅनिमेटेड चित्रपट येत असून या चित्रपटाचे ती दिग्दर्शन करत आहे. तिच्या एकंदर कारकिर्दीविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...हजारो ख्वाइशे ऐसी या चित्रपटाचे लेखन केल्यानंतर तू अॅनिमेशनकडे कशी वळलीस?मी लहानपणापासूनच अॅनिमेशन चित्रपटांची चाहती आहे. हॉलिवूडमधील अनेक अॅनिमेशन चित्रपट मी पाहिले आहेत. हे चित्रपट तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत एकत्र पाहू शकतात असे मला वाटते. मला हनुमान हे दैवत लहानपणापासूनच आवडते. ते आपल्या भारतातील सुपर हिरो आहेत असे माझे म्हणणे आहे. त्यामुळे मी त्यांच्यावरच चित्रपट बनवायचे ठरवले. गेल्या कित्येक वर्षांपासून माझ्या मनात ही कथा घोळत होती. त्यामुळे मी त्या कथेवर काम करायला सुरुवात केली.या अॅनिमेशन चित्रपटाला अनेक सेलिब्रिटींनी आवाज दिला आहे, हे कसे काय जुळून आले?माझा अॅनिमेशन चित्रपट हा हॉलिवूडच्या तोडीचा बनला पाहिजे असे मला वाटत होते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मी सगळे प्रयत्न करत होते. पण त्याचसोबत या चित्रपटातील सगळ्या पात्रांना प्रसिद्ध कलाकारांनी आवाज द्यावा असे मला नेहमीच वाटत होते आणि त्यामुळे मी काही कलाकारांशी त्याबाबत बोलले. सगळ्यांनाच या चित्रपटाची कथा आवडली. कारण या चित्रपटाद्वारे मी लोकांना काहीही ज्ञान देण्याचा प्रयत्न केला नाहीये तर एक गंमतशीर गोष्ट यात मांडली आहे. आजच्या पिढीला ही गोष्ट त्यांचीच वाटेल अशी मी लिहिली आहे. त्यामुळे सलमान खान, जावेद अख्तर, रवीना टंडन यांसारखे प्रसिद्ध सेलिब्रिटी माझ्या पात्रांना आवाज द्यायला तयार झाले.अॅनिमेशन चित्रपटाचे दिग्दर्शन करणे किती कठीण असते असे तुला वाटते?मी याआधी यस्टरडे अँड टूमारो या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पण अॅनिमेशन चित्रपट दिग्दर्शित करणे आणि इतर चित्रपट दिग्दर्शित करणे यात जमीन आस्मानचा फरक आहे. अॅनिमेशन चित्रपटासाठी 20-30 टक्के तरी अधिक मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक फ्रेमचा अभ्यास करावा लागतो. चित्रीकरण झाल्यानंतरही चित्रपटावर खूप सारे काम करावे लागते. पण तरीही मी हे सगळे खूप एन्जॉय केले.तू एक लेखिका असताना दिग्दर्शनाकडे कशी वळलीस?दिग्दर्शन करण्याचा माझा खूप आधीपासून विचार होता. पण या इंडस्ट्रीत कोणीच माझे ओळखीचे नसल्याने मी सुरुवातीला लेखन करण्याचा विचार केला. मी लिहिलेली कथा प्रोडक्शन हाऊसला आवडली आणि त्यावर चित्रपट बनवला गेला. माझ्या पहिल्याच चित्रपटाचे लोकांनी आणि समीक्षकांनी कौतुक केले. लेखक म्हणून मी जम बसवल्यावर दिग्दर्शनाकडे वळली. लेखन करणे आणि दिग्दर्शन करणे या दोन्ही गोष्टी मला आवडतात.