Join us  

राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावर कंगना राणौत संतापली, म्हणाली - 'चांगलं स्टँडअप कॉमेडी होतं'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 2:53 PM

कंगना राणौतने राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.

लोकसभेच्या निकालानंतर संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये बरीच खडाजंगी होत आहे. त्यातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला.  राहुल गांधी यांनी भाषण करतानाच भगवान शंकराचा फोटो दाखवून टिप्पणी केली. त्यावरुन सभागृहात गदारोळ झाला. भाजपाच्या खासदारांनी राहुल गांधी यांना विरोध केला. या सगळ्यावर गोंधळावर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिनं प्रतिक्रिया दिली आहे. 

कंगना राणौतने राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. तसेच तिने राहुल गांधींचं भाषण म्हणजे  स्टँडअप कॉमेडी होत, असं म्हटलं. शिवाय, राहुल गांधी देशाची माफी मागावी, अशी मागणीही तिनं केली. कंगना म्हणाली, 'राहुल गांधींनी एक चांगली स्टँडअप कॉमेडी केली. त्यांनी अनेक तक्रारी मांडल्या. आपल्या भाषणात त्यांनी सर्व देवी-देवतांना काँग्रेसचं ब्रँड ॲम्बेसेडर बनवलं. त्यांनी देव-देवतांचे फोटो डेस्कवर ठेवले होते. हिंदू धर्माला हिंसक म्हणत त्यांनी सर्व सीमा पार केल्या. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे'.

कंगनाने सोशल मीडियावरही पोस्ट शेअर करत राहुल गांधींवर टीका केली. "राहुल गांधींनी ताबडतोब काही थेरपी घ्यावी. अनेक मानसशास्त्रज्ञ सहमत असतील की, आपल्या इच्छेच्याविरुद्ध आई किंवा कुटुंबाच्या दबावामुळे आपण एखादी गोष्ट करतो, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते", असं ती म्हणाली. 

दरम्यान राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विविध मुद्दे मांडले. राहुल गांधी सरकारला घेरण्यासाठी भगवान शंकर, गुरुनानक देव आणि जीसस क्राईस्ट यांचे छायाचित्र घेऊन संसदेत आले. भगवान शंकराचा फोटो दाखवत ते कधी भय दाखवत नाहीत, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांनी अग्निवीर, शेतकरी, मणिपूर, NEET परीक्षा, बेरोजगारी, नोटबंदी, GST, MSP, हिंसा, भय, धर्म, अयोध्या, गुजरात, जम्मू-कश्मीर, लडाख, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष या मुद्यांवरुन सरकारला घेरले.  

टॅग्स :कंगना राणौतराहुल गांधीसेलिब्रिटीबॉलिवूडहिंदू