बॉलिवूडचे गीतकार जावेद अख्तर ट्विट करतील आणि चर्चेत येणार नाहीत, असे शक्यच नाही. जावेद यांचे एक ट्विट सध्या काहीसे वादात सापडले आहे. होय, अजानविषयी एक ट्विट करणे त्यांना चांगलेच महागात पडले. या ट्विटनंतर नेटक-यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले. अजानबद्दल केलेले त्यांचे हे ट्विट अनेकांना रूचले नाही आणि नेटक-यांनी त्यांना फैलावर घेतले. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर एक मोठा वादविवाद सुरु झाला.
काय केले ट्विट
‘ भारतात ५० वर्षांपर्यंत लाऊड स्पीकरवर अजान लावणे ‘हराम’ होते. मात्र कालांतराने ते ‘हलाल’ झालें. अशा प्रकारे ‘हलाल’ झाले की त्याची कोणतीही सीमा राहिली नाही. अजान करणे चांगली गोष्ट आहे. मात्र लाऊड स्पीकरवर अजान लावल्यामुळे त्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे या परिस्थितीत तरी ते बदलतील, अशी आशा मला आहे,’ असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले.
लोकांनी केले ट्रोल
अन्य एका युजरने तर त्यांना चांगलेच सुनावले. ‘तुमच्या मताशी मी पूर्णपणे असहमत आहे. कृपया इस्लाम व त्याच्याशी संबंधित श्रद्धांवर बोलणे थांबवा. आम्ही लाऊड स्पीकरवर गाणी वाजवत नाही़ तर अजान वाजवतो. जी एक अतिशय सुंदर प्रार्थना आहे,’ असे या युजरने लिहिले.