आयटम गर्ल मलाइका अरोराला पुरुषांच्या आवडतात ‘या’ दोन गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 9:25 AM
आपल्या हॉट आणि सेक्सी अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहणारी आयटम गर्ल मलाइका अरोरा हिने एका मुलाखतीत पुरुषांच्या तिला कोणत्या दोन ...
आपल्या हॉट आणि सेक्सी अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहणारी आयटम गर्ल मलाइका अरोरा हिने एका मुलाखतीत पुरुषांच्या तिला कोणत्या दोन गोष्टी आवडतात याबाबतचा खुलासा केला आहे. ४४ वर्षीय मलाइका आजही तितकीच फिट आणि सुंदर दिसत असून, तिचे सातत्याने समोर येणारे फोटो घायाळ करणारे आहेत. काही दिवसांपूर्वीच मलाइकाने तिचा वाढदिवस साजरा केला. यासाठी ती विदेशात गेली होती. त्याचे काही फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. मलाइकाच्या या फोटोची त्यावेळी चांगलीच चर्चाही रंगली होती. खरं तर मलाइका वाढत्या वयाबरोबर अधिक सुंदर दिसत असल्याने दिवसागणिक लोकप्रिय होत आहे. सोशल मीडियावर तर तिच्या फॅन्सची संख्या लाखोंच्या संख्येने वाढत आहे. असो, मलाइकाने एका मुलाखतीत पुरुषांबद्दल एक वक्तव्य केले आहे त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिने पुरुषांच्या दोन गोष्टींवर प्रकाशझोत टाकताना म्हटले की, मला त्याचे शूज आणि तोंड या दोन गोष्टी इम्प्रेस करतात. कारण मला असे वाटते की, एखाद्या पुरुषाचे शूज चांगले असतील तर ते समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेस पाडण्यासाठी पुरेसे आहेत. त्याचबरोबर मला अधिक बोलणारे लोक आवडत नसल्याने कमी बोलणाºया तोंडाचे लोक आवडतात, असेही मलाइकाने म्हटले. मलाइकाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. असो, पती अरबाज खान याच्यापासून विभक्त झाल्यानंतर ती एकाकी जीवन जगत आहे. आपल्या मॉडलिंग लाइफस्टाइलबरोबरच ती चित्रपट निर्मिती क्षेत्रातही नशीब आजमावत आहे. त्याचबरोबर ती छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्येदेखील परीक्षकांच्या भूमिका साकारत आहे. दरम्यान, मलाइकाच्या या दोन आवडी बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या नसतील तरच नवल.