Join us

Jab We Met 2: ब्रेकअपच्या अनेक वर्षानंतर करिना कपूर आणि शाहिद कपूर पुन्हा एकत्र काम करणार?, अभिनेता म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 11:49 AM

शाहिद कपूर आणि करिना कपूरचा सुपरहिट सिनेमा 'जब वी मेट' आठवतोय? होय तोच सिनेमा ज्यामुळे करिना कपूरला आजही चाहते गीत म्हणूनच जास्त ओळखतात.

शाहिद कपूर आणि करिना कपूरचा सुपरहिट सिनेमा 'जब वी मेट' आठवतोय? होय तोच सिनेमा ज्यामुळे करिना कपूरला आजही चाहते गीत म्हणूनच जास्त ओळखतात. 2007 मध्ये रिलीज झालेला, हा रोमँटिक-कॉमेडी खूप हिट ठरला होता. चाहते अनेकदा चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत होते. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित नवीन माहिती समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, 'जब वी मेट'चा सिक्वेल बनवण्यात येणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, अष्टविनायकचे मालक राज मेहता या चित्रपटाची निर्मिती गंधार फिल्म्स बॅनरखाली करणार आहेत. गंधार ग्रुपने 2021 मध्ये गंधार फिल्म्स अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून मनोरंजन क्षेत्रात एंट्री केली. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक इम्तियाज अली 'जब वी मेट'च्या सिक्वेलचे दिग्दर्शनही करू शकतात, अशीही माहिती मिळतेय आहे.

मात्र, 'जब वी मेट २' बाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आता करीना कपूर खान आणि शाहिद कपूर या चित्रपटासाठी एकत्र येऊन 'गीत' आणि 'आदित्य' या भूमिकेत पुन्हा दिसणार का, अशी चर्चा रंगली आहे.या 

जब वी मेट काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला होता. मात्र, त्यादरम्यान शाहिद कपूरला या आयकॉनिक चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये भूमिका साकारायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शाहिद म्हणाला की, हे स्क्रिप्टवर अवलंबून असते. शाहिदने त्याच्या जब वी मेट सह-अभिनेत्री करीनाचे कौतुक केले आणि तिच्याशिवाय ती भूमिका कोणीही साकारू शकत नसल्याचे म्हणाला होता.

टॅग्स :करिना कपूरशाहिद कपूर