जॅकलिन फर्नांडिसच्या ‘एक दो तीन...’वर सरोज खान यांनी तोडली चुप्पी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 7:16 AM
‘बागी2’मधील जॅकलिन फर्नांडिसवर चित्रीत करण्यात आलेले ‘एक दो तीन...’ हे गाणे सध्या चर्चेत आहे. या आयकॉनिक गाण्याचे ‘बागी2’मध्ये रिक्रिऐट ...
‘बागी2’मधील जॅकलिन फर्नांडिसवर चित्रीत करण्यात आलेले ‘एक दो तीन...’ हे गाणे सध्या चर्चेत आहे. या आयकॉनिक गाण्याचे ‘बागी2’मध्ये रिक्रिऐट करण्यात आलेले नवे व्हर्जन अनेक लोकांना आवडलेले नाही. ‘तेजाब’चे दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी तर जॅकलिनचे हे गाणे थेट ‘सेक्स अॅक्ट’ ठरवलेयं. ‘एक दो तीन....’च्या नव्या गाण्याचा ट्रॅक बघून मला धक्का बसलायं. माधुरीच्या अदांनी सजलेल्या या आयकॉनिक गाण्याचे असे हाल केले जातील, असा मी स्वप्नातही विचारही केला नव्हता. या गाण्यासाठी जॅकलिन फर्नांडिसची निवड होईल, याची तर अजिबात अपेक्षा केली नव्हती. माधुरीच्या जागी जॅकलिन हे म्हणजे सेन्ट्रल पार्कला बॉटेनिकल गार्डनमध्ये बदलण्यासारखे आहे. माधुरीच्या डान्समध्ये एक निष्पापपणा होता. याऊलट जॅकलिनचे गाणे म्हणजे ‘सेक्स अॅक्ट’ आहे, अशी प्रतिक्रिया एन. चंद्रा यांनी दिली होती. केवळ इतकेच नाही तर कोरिओग्राफर सरोज खान आणि एन. चंद्रा या रिक्रिएटेड व्हर्जनविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचीही खबर आली. पण कदाचित असे नाहीयं. होय, कारण कालपर्यंत ‘एक दो तीन....’च्या रिक्रिएटेड व्हर्जनवर ‘नो कमेंट्स’ म्हणणा-या सरोज खान यांनी आज वेगळाच सूर आवळला आहे. ‘एक दो तीन....’च्या रिक्रिएटेड व्हर्जन गाणे पाहून मी अतिशय आनंदी आहे आणि या आयकॉनिक गाण्याला ट्रिब्युट देणारे अहमद आणि गणेश यांचा मला अभिमान आहे. माझा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे,’असे सरोज खान म्हणाल्या. निश्चितपणे त्यांची ही प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे.तुम्हाला ठाऊक असेलचं की, ‘तेजाब’मधील माधुरी दीक्षितवर चित्रीत करण्यात आलेले ‘एक दो तीन’ हे गाणे सरोज खान यांनी कोरिओग्राफ केले आहे. तर एक दो तीन....’चे नवे व्हर्जन अहमद खान आणि गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केले आहे. ALSO READ : जॅकलिन फर्नांडिसच्या ‘एक दो तीन....’ वर भडकले ‘तेजाब’चे दिग्दर्शक! म्हणे, हे तर ‘Sex Act’!!