जॅकलिन फर्नांडिसच्या ‘एक दो तीन....’ वर भडकले ‘तेजाब’चे दिग्दर्शक! म्हणे, हे तर ‘Sex Act’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 05:06 AM2018-03-22T05:06:59+5:302018-03-22T10:41:16+5:30
होय, जॅकलिनने रिक्रिएट केलेले ‘एक दो तीन....’चे हे नवे व्हर्जन वादात सापडले आहे. ‘तेजाब’चे दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी या रिक्रिएटेड गाण्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
> माधुरी दीक्षितच्या ‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दो तीन....’ या सुपरहिट गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन तुम्ही पाहिलेच. ‘बागी2’मधील या नव्या व्हर्जनमध्ये जॅकलिन फर्नांडिस थिरकतांना दिसतेयं. निश्चितपणे जॅकलिनने या गाण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलीयं. पण तिची ही मेहनत धूळीस मिळाल्याचे चित्र आहे. होय, जॅकलिनने रिक्रिएट केलेले ‘एक दो तीन....’चे हे नवे व्हर्जन वादात सापडले आहे.
‘तेजाब’चे दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी या रिक्रिएटेड गाण्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. मूळ गाणे कोरिओग्राफर करणा-या कोरिओग्राफर सरोज खान यांनीही या गाण्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. केवळ इतकेच नाही तर या दोघांनी ‘एक दो तीन....’ च्या नव्या व्हर्जनविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी चालवली असल्याचीही खबर आहे.
‘तेजाब’चे दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी या रिक्रिएटेड गाण्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. मूळ गाणे कोरिओग्राफर करणा-या कोरिओग्राफर सरोज खान यांनीही या गाण्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. केवळ इतकेच नाही तर या दोघांनी ‘एक दो तीन....’ च्या नव्या व्हर्जनविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी चालवली असल्याचीही खबर आहे.
‘एक दो तीन....’च्या नव्या गाण्याचा ट्रॅक बघून मला धक्का बसलायं. माधुरीच्या अदांनी सजलेल्या या आयकॉनिक गाण्याचे असे हाल केले जातील, असा मी स्वप्नातही विचारही केला नव्हता. या गाण्यासाठी जॅकलिन फर्नांडिसची निवड होईल, याची तर अजिबात अपेक्षा केली नव्हती. माधुरीच्या जागी जॅकलिन हे म्हणजे सेन्ट्रल पार्कला बॉटेनिकल गार्डनमध्ये बदलण्यासारखे आहे. माधुरीच्या डान्समध्ये एक निष्पापपणा होता. याऊलट जॅकलिनचे गाणे म्हणजे ‘सेक्स अॅक्ट’ आहे, अशी प्रतिक्रिया एन. चंद्रा यांनी दिली आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहे. चर्चा खरी मानाल तर, सरोज खान यांनी नुकतीच एन. चंद्रा यांची भेट घेतली. या भेटीत ‘एक दो तीन....’च्या रिक्रिएटेड व्हर्जनविरोधात कायदेशीर पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ही चर्चा किती खरी आणि किती खोटी, हे लवकरचं कळेल. तोपर्यंत याबद्दल तुम्हाला काय वाटते, ते आम्हाला जरूर कळवा.
‘बागी2’मधील ‘एक दो तीन....’चे नवे व्हर्जन अहमद खान आणि गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केले आहे. तर संदीप शिरोडकरने रिक्रिऐट केले आहे.