Join us

Jackie Shroff-Tiger Shroff : एकाचं 'जयकिशन' तर.. जॅकी दादा अन् मुलगा टायगर यांची खरी नावं माहितीएत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 9:45 AM

आपल्या लाडक्या अभिनेत्यांची खरी नावं अगदी चाहत्यांनाही माहित नसतात.

Jackie Shroff-Tiger Shroff : बॉलिवूडमध्ये अनेकांना टोपण नावानेच हाक मारतात. आपल्या लाडक्या अभिनेत्यांची खरी नावं अगदी चाहत्यांनाही माहित नसतात. आता हेच बघा टायगर हे कोणाचं नाव कसं ठेवलं जाऊ शकतं पण अभिनेता टायगर श्रॉफ त्याच नावाने ओळखला जातो. फक्त टायगरच नाही तर त्याचे वडील जॅकी दादाचंही खरं नाव वेगळंच आहे. आज टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याचं खरं नाव काय जाणून घ्या 

टायगर लहानपणापासूनच फिटनेसफ्रिक आहे. शाळेत असतानात त्याने मार्शल आर्ट्सचे धडे गिरवले आहेत. त्याचं खरं नाव 'जयहेमंत श्रॉफ' (Jai Hemant Shroff) असं आहे. मग त्याचं 'टायगर' हे नाव कसं पडलं ? तर बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याला डान्स, स्पोर्ट्स याचीच आवड होती. तो मार्शल आर्ट्स मध्येही तरबेज होता. पण त्याने पुढे अभिनय करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला घरात 'टायगर' या नावाने बोलवलं जायचं. मग बॉलिवूडमध्येही त्याने याच नावाने एंट्री केली. त्यामुळे त्याचं खरं नाव जय हेमंत श्रॉफ मागेच पडलं.

जॅकी दादाचं खरं नाव 

बॉलिवूडचा 'भि़ड़ू' जॅकी दादा म्हणजेच जॅकी श्रॉफचं (Jackie Shroff)   खरं नावही भलतंच आहे. 'जॅकी' हे त्याचं टोपणनाव आहे ज्या नावानेच त्याला ओळखले जाते. मात्र त्याचं खरं नाव 'जयकिशन काकूभाई श्रॉफ' (Jaikishan Kakubhai Shroff) असं आहे. हे लांबलचक नाव न घेता त्याला शाळेत जॅकी नावाने बोलवले जायचे. म्हणून तो जॅकी नावानेच लोकप्रिय झाला. चाळीत वाढलेल्या जॅकी दादाने सुभाष घई यांच्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि तो एका रात्रीत स्टार झाला.

टायगर श्रॉफ लवकरच 'गणपत' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये क्रिती सेननचीही मुख्य भूमिका आहे. टायगर आणि क्रिती दोघांनी 'हिरोपंती' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

टॅग्स :जॅकी श्रॉफटायगर श्रॉफबॉलिवूड