जॅकी श्रॉफने अनिल कपूरच्या मारली होती कानाखाली, त्यानेच सांगितले यामागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 03:03 PM2019-12-24T15:03:09+5:302019-12-24T15:08:24+5:30
अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ हे दोघे बेस्ट फ्रेंड असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
अनिल कपूरचा आज वाढदिवस असून बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची आज गणना केली जाते. अनिलने साठी ओलांडलीय. पण आजही त्याला पाहताच ‘झक्कास’ हा एकच शब्द आठवतो. अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ हे दोघे बेस्ट फ्रेंड असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
अनिल आणि जॅकीने राम लखन, त्रिमूर्ती, युद्ध, अंदाज अपना, रूप की रानी चोरों का राजा, कभी ना कभी असे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्या दोघांच्या बाबतीतला एक किस्सा नुकताच निर्माता विधु विनोद चोप्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला आहे. हा किस्सा जवळजवळ 30 वर्षांपूर्वीचा आहे.
विधु विनोद चोप्राने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत काही दिवसांपूर्वी याविषयी सांगितले होते. या व्हिडिओत आपल्याला विधु विनोद चोप्रा शिवाय अनुराग कश्यप, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ यांना पाहायला मिळाले होते. या व्हिडिओत अनिल आणि जॅकी परिंदा या चित्रपटाविषयी सांगत आहेत. या व्हिडिओसोबत विधु विनोद चोप्राने लिहिले होते की, अनिल नेहमीच त्याच्या कामाच्याबाबतीच अतिशय परफेक्ट असतो. एखादे दृश्य चांगले होत नाही तोपर्यंत तो रिटेक देत असतो. एकदा तर एक शॉर्ट चांगला येण्यासाठी अनिलने 17 रिटेक दिले होते.
@AnilKapoor has always been a perfectionist when it comes to his shots. Here is @bindasbhidu sharing how it took 17 'hard' takes to get the final cut for one of #Parinda's scenes. #30YearsOfParinda@MadhuriDixitpic.twitter.com/yWpratNupx
— Vidhu Vinod Chopra Films (@VVCFilms) October 31, 2019
या व्हिडिओत आपल्याला परिंदा या चित्रपटातील एक दृश्य पाहायला मिळत आहे. या दृश्यात अनिल आणि जॅकी यांच्यात प्रचंड भांडणं सुरू असून रागाच्या भरात जॅकी अनिलच्या कानाखाली मारताना दिसत आहे. या व्हिडिओत जॅकी सांगत आहे की, मोठ्या भावाने कानाखाली मारल्यानंतर काय त्रास होऊ शकतो हे अनिलला या दृश्यात दाखवायचे होते. पहिलाच शॉर्ट अतिशय मस्त झाला होता. अनिलच्या चेहऱ्यावरचे भाव देखील एकदम परफेक्ट होते. पण अनिलने केवळ या दृश्यासाठी अजून एक अजून एक म्हणत चक्क 17 कानाखाली खालल्या.