Join us

​ जॅकी श्रॉफ यांच्या ‘शून्यता’ने जिंकला बेस्ट शॉर्ट फिल्मचा अवार्ड! तुम्ही पाहिली?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 6:36 AM

जॅकी श्रॉफ इतक्यात मोठ्या पडद्यावर दिसले नाहीत. पण तरीही सध्या त्यांची जोरदार चर्चा आहे. होय, जॅकी यांच्या ‘शून्यता’ या शॉर्ट्सफिल्मने इंटरनॅशनल अवार्डवर नाव कोरले आहे.

जॅकी श्रॉफ इतक्यात मोठ्या पडद्यावर दिसले नाहीत. पण तरीही सध्या त्यांची जोरदार चर्चा आहे. होय, जॅकी यांच्या ‘शून्यता’ या शॉर्ट्सफिल्मने इंटरनॅशनल अवार्डवर नाव कोरले आहे. अमेरिकेच्या लॉस एंजिल्स येथे बेस्ट आॅफ इंडिया शॉर्ट फिल्म्स फेस्टिवलमध्ये ‘शून्यता’ला बेस्ट शॉर्ट फिल्मच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. चिंतन सारडा दिग्दर्शित सुमारे २२ मिनिटांच्या या शॉर्ट फिल्मने हजारो शॉर्ट फिल्म्सच्या यादीत सर्वोत्कृष्ट सहामध्ये जागा पटकावली. यानंतर ही शॉर्ट फिल्म लॉस एंजिल्सच्या एका थिएटरमध्ये दाखवली गेली. येथे या शॉर्ट फिल्मला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.  तिकिट काढून लोकांनी ही शॉर्ट फिल्म पाहिली.  प्रेक्षकांचा हा अभूतपूर्व प्रतिसाद व प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर ज्युरींनी ‘शून्यता’ला बेस्ट शॉर्ट फिल्म म्हणून जाहिर केले. बेस्ट शॉर्ट फिल्मच्या पुरस्कारदाखल ‘शून्यता’ला १ हजार डॉलरच्या रोख पुरस्काराने गौरविण्यात आले. चित्रपटाचे दिग्दर्शक  चिंतन सारडा यांनी याबद्दल सर्वांचे आभार मानलेत. या समारोहाचा भाग बनणे अभिमानाची बाब होती. जॅकी श्रॉफसह सर्व कलाकारांमुळे ही शॉर्ट फिल्म बेस्ट ठरली. मी सर्वांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.ALSO READ : १३ वर्षांच्या मुलीवर भाळला होता जॅकी श्रॉफ; वाचा, ‘जग्गू दादा’ची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी!!‘शून्यता’मधील जॅकी यांचा क्रिमिनल अंदाज बघण्यासारखा आहे. गतवर्षी आॅगस्टमध्ये रिलीज झालेल्या या शॉर्ट फिल्मला यु ट्यूबवर आत्तापर्यंत सहा लाखांवर लोकांनी पाहिले आहे. एका गँगस्टरच्या आयुष्यावर बेतलेल्या या शॉर्ट फिल्ममध्ये जॅकी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय बालकलाकार मच्छिंद गडकर, सुनील वेद आणि लेख टंडन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अलीकडे जॅकी नेहा धूपियाच्या एका चॅट शोमध्ये आले होते. या चॅट शोमध्ये नेहाने जॅकी यांना मुलगा टायगर व त्याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटानीबद्दल विचारले होते. दिशा व टायगर या दोघांपैकी कोण चांगली अ‍ॅक्टिंग करतो, असे तुम्हाला वाटते? असा प्रश्न नेहाने केला होता. यावर एक क्षणही न दवडता जॅकींनी ‘टायगर’ असे उत्तर दिले होते.