Join us

इंटरनेटवर व्हायरल झालं जॅकी भगनानीचे नवं गाणं, अमायरा दस्तूरच्या अदांनी जिंकले चाहत्यांचे मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 15:24 IST

आजकाल म्युझिक व्हिडिओंचा ट्रेंड पुन्हा जोरात सुरू आहे.

आजकाल म्युझिक व्हिडिओंचा ट्रेंड पुन्हा जोरात सुरू आहे. मोठ्या कलाकारांचे संगीत व्हिडिओ अल्बम येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर आणि रकुलप्रीत सिंग यांचा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला. त्यानंतर आता अमायरा दस्तूर एका नवीन म्युझिक व्हिडिओमध्ये दिसते आहे. जॅकी भगनानीच्या जजस्ट म्युझिकच्या बॅनरखाली तयार झालेला  'वाह जी वाह' म्युझिक व्हिडिओ आज रिलीज झाला आहे.

या व्हिडिओ अल्बममध्ये अमायरा दस्तूर सोबत पंजाबी संगीत इंडस्ट्रीचा अभिनेता आणि गायक गुरनजर चट्ठासुद्धा दिसतो आहे.प्रदर्शनापूर्वी, जेजस्ट म्यूजिकच्या टीमने गाण्याचे स्निपेट्स आणि स्टिल्स प्रदर्शित केले होते ज्याने चाहत्यांची   उत्कंठा वाढवली होती. गाण्याची पहिली झलक सादर करण्यात आली होती ज्यात गुरनजर चट्ठा आणि अमायरा दस्तूर एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत होते ज्याने रसिकांना गाण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली.

या गाण्याची निर्मिती जॅकी भगनानीच्या जेजस्ट म्यूजिकद्वारे करण्यात आली आहे, ज्यांनी या आधी ‘प्रादा’मध्ये आलिया भट्ट, ‘जुगनी 2.0’ मध्ये कनिका कपूर, एक शांतिप्रिय ट्रॅक कृष्णा महामंत्र आणि 'मुस्कुराएगा इंडिया' जो एक परफेक्ट एंथम आहे, अशासारखी अनेक हिट गाणी दिली आहेत. जेजस्ट म्यूजिकचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता हे गाणे देखील दर्शकांना आपल्या तालावर थिरकायला लावेल, यात शंका नाही. 

टॅग्स :अमायरा दस्तूरजॅकी भगनानी