Join us

जॅकलिन फर्नांडिस व सलमान खानने केले असे काही! लोक म्हणाले, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 7:10 AM

सलमान खान सध्या ‘रेस3’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अलीकडे याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान, जॅकलिन फर्नांडिस व अनिल कपूर एका रिअ‍ॅलिटी ...

सलमान खान सध्या ‘रेस3’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अलीकडे याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान, जॅकलिन फर्नांडिस व अनिल कपूर एका रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्ये पोहोचले. पण याठिकाणी सलमान व जॅकने प्रमोशनऐवजी एक नवा वाद ओढवून घेतला. होय, या रिअ‍ॅलिटी शोमधील जॅक व सलमानची एक कृती लोकांना चांगलीच खटकली आणि मग काय लोकांनी दोघांनाही चांगलेच धारेवर धरले. आता नेमके झाले काय, ते जाणून घेऊ यात. तर या शोमध्ये एका स्पर्धक मुलाचा परफॉर्मन्स बघून जॅक चांगलीच खूश झाली आणि मला तुला हग करायचे आहे, असे म्हणून त्या मुलाच्या विनवण्या करू लागली. पण त्या चिमुकल्याने जॅकला चक्क नकार दिला. हे पाहून सगळेच हसायला लागले. तुला हग का द्यायचे नाही, असे सलमानने लगेच त्या चिमुकल्याला विचारले. यावर, असेच माझे मन नाही, असा तो चिमुकला स्पर्धक म्हणाला. यानंतर सलमानने गमतीगमतीत त्या मुलाचा चांगलाच क्लास घेतला. ‘अच्छा मन नहीं है, अबे उधर ही रू....,’असे म्हणत सलमान स्टेजवर गेला. यानंतर सलमानने मुलाला मागून पकडून ठेवले अन् जॅकने त्याला हग केले. जॅकने हा व्हिडिओ आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. काहींना हा व्हिडिओ भलताच आवडला. अर्थात त्यांनी तो गमतीत घेतला. पण अनेकांना तो खटकला. यावरून अनेकांनी सलमान व जॅकला चांगलेच सुनावले़. एका युजरने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.  ‘त्या मुलाला हग करायची इच्छा नव्हती. सलमान व जॅकलिनने त्याच्या इच्छेचा सन्मान करायला हवा होता,’ असे या युजरने लिहिले. अन्य एका युजरने, जॅक व सलमान आम्हाला तुमच्याकडून अशा व्यवहाराची अपेक्षा नाही, असे सांगून सुनावले.एकंदर काय तर, गमती जमतीत केलेला प्रकार जॅक व सलमानला चांगलाच महाग पडला. अनेकांना त्यांचे हे वागणे आवडले नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटते, ते जरूर कळवा.ALSO READ : थंडीने कुडकुडत आहे जॅकलीन, तर बनियानवर डॅशिंग अंदाजात दिसला सलमान खान!!किक’च्या यशानंतर सलमान आणि जॅकलीन ही ब्लॉकबस्टर जोडी दुसºयांना अ‍ॅक्शन थ्रिलर करताना दिसणार आहेत. चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ईदनिमित्त प्रदर्शित होणार आहे.