आधुनिक युगात जगाला सोशल मीडियाने जवळ आणले आहे. तसेच सेलिब्रेटींनादेखील सोशल मीडियामुळे सहजरित्या चाहत्यांच्या संपर्कात राहता येते आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीजदेखील सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती नेहमी सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. मात्र नुकतेच तिने एका मुलाखतीत सोशल मीडियाला अस्थिर आणि विषारी म्हटले आहे.
जॅकलीन फर्नांडिसने एका मुलाखतीत सांगितले की, “आपल्या हातात उरलेला अतिरिक्त वेळ सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक निरर्थक स्क्रॉलिंगमध्ये वाया घालवणारा मनुष्य हा एकमात्र प्राणी आहे. सध्याच्या घडीला ही एक अतिशय विषारी आणि अस्थिर जागा आहे. मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ठाम विश्वास असणारी व्यक्ती आहे मात्र अनेकजण असे आहेत जे या मंचाचा दुरुपयोग करत आहेत."
जॅकलीन पुढे म्हणाली की, "मी माझ्या चाहत्यांसोबत शांतपणे गप्पा मारण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करते, जो मी आज देखील सुरु ठेवला आहे. मात्र, या साईट्सवर खर्च होणारा वेळ मी कमी करत आहे. या व्यतिरिक्त, मी माझे लक्ष इतर अॅपलीकेशन्सकडे वळवले आहे. मैं पिनट्रेस्ट (Pinterest) वर पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत केले आहे. एक असे अॅप, जे मी माझ्या किशोर वयात मोठ्या उत्साहाने वापरले आहे आणि जे मी आता माझ्या भूमिका आणि माझे चित्रपट यांच्या कामासाठी वापरते आहे.
ती पुढे म्हणाली की, मी मेडिटेशन अॅप देखील डाउनलोड केले आहे. मी पॉडकास्ट ऐकते आणि ‘सारा ब्लाकली’ची स्पैंक्स लॉन्च जर्नी शिकण्यासाठी मी ‘नतालिया पोर्टमैन’च्या एक्टिंग वर्कशॉपचा मास्टरक्लास देखील सुरु केला आहे. हे सर्वच प्रेरक आणि सकारात्मक आहे. इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून इतरांच्या आयुष्याचे नियमित अनुसरण करत राहण्यापेक्षा मला रचनात्मक ज्ञान प्रदान करणाऱ्या अॅप्सवर वेळ घालवणे अधिक अर्थपूर्ण वाटते.”