Jacqueline Fernandez : 200 कोटींच्या मनी लॉंडरिंग (Money Laundering Case) प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात असलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने आता पटियाला हाऊस कोर्टात नवी याचिका दाखल केली आहे. २७ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान दुबईला (Dubai) जाण्याची परवानगी तिने मागितली आहे. जॅकलीन पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये सामील होण्यासाठी दुबईला जाणार आहे.
यापूर्वी जॅकलीन ने २९ जानेवारी रोजी एक दिवस दुबईला जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र ती नंतर मागे घेण्यात आली. तर पटियाला हाऊस कोर्टाने ईडी ला २७ जानेवारी पर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. आता जॅकलीनच्या या नव्या याचिकेवर २७ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
200 कोटींच्या मनी लॉंडरिंगप्रकरणी सुकेश चंद्रशेखर अटकेत आहे. याप्रकरणाची सुनावणी २३ जानेवारी रोजी स्थगित करण्यात आली होती. कोर्टाने १५ फेब्रुवारी पर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. तर जॅकलीनला दिलासा देत वैयक्तिकरित्या उपस्थित न राहण्याची सूट दिली होती.
जॅकलीन याआधी १८ जानेवारी कोर्टासमोर दाखल झाली होती. यावेळी तिने सुकेशर अनेक गंभीर आरोप लावले. सुकेश माझ्या भावनांसोबत खेळला, माझं करिअर उद्धवस्त केलं असं ती म्हणाली. सुकेशने तिला सन टीव्हीचा मालक असल्याचं सांगत ओळख वाढवली होती आणि तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या नात्यात असल्याचं खोटं सांगितलं असा दावा जॅकलीनने केला.