महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar ) 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये दिल्लीच्या मंडोली तुरूंगात बंद आहे. सुकेशसोबत या प्रकरणात बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही सुद्धा अडकली आहे. सुकेशने आता तुरूंगातून आपल्या वकीलाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात सुकेशने जॅकलिनबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
पत्रात काय म्हणाला सुकेशवकीलाला लिहिलेल्या पत्रात सुकेशने जॅकलिनची बाजू घेत, 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिची काहीही भूमिका नसल्याचं म्हटलं आहे. त्याने लिहिले, ‘मी जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्यात. कार दिली. कारण मी जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता. रिलेशनशिपमध्ये असताना मी तिला व तिच्या कुटुंबाला या भेटवस्तू दिल्या होत्या. यात तिचा काय दोष? पीएमएलए प्रकरणात तिचं नाव गोवलं जाणं हे फारच दुर्दैवी आहे. जॅकलिनला माझ्याकडून काहीही नको होतं. तिने फक्त माझ्याकडून प्रेम आणि सोबतीची अपेक्षा केली होती. याशिवाय तिने मला कधीच काही मागितलं नाही. जॅकलिन व तिच्या कुटुंबावर खर्च करण्यात आलेला एक एक पैसा कायदेशीररित्या कमावलेला आहे आणि लवकरच कोर्टात हे सिद्ध होईल.’पुढे तो लिहितो, ‘मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन व तिच्या कुटुंबाला ओढण्याची काहीही गरज नव्हती. त्यात तिची काहीही चूक नाही आणि हे मी लवकरच कोर्टात सिद्ध करेल. जॅकलिनने जे काही गमावलं, ते एक दिवस मी तिला नक्की मिळवून देईल. तिला पूर्णपणे निर्दोष सिद्ध करेल.’सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाी सध्या ईडीकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात जॅकलीन सहआरोपी आहे.