Join us

जॅकलीन फर्नांडिसने न्यूयॉर्कमध्ये फडकावला तिरंगा, लाल रंगाच्या साडीत दिसली सुंदर परी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 1:49 PM

जॅकलीनने न्यूयॉर्कमध्ये आयोजित 'भारत दिवस' परेडमध्ये सहभागी होत तिरंगा फडकवला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीलंकन ब्युटी अशी ओळख असलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueliene Fernandez). गेल्या काही दिवसांपासून जॅकलीन प्रोफेशनल नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. महाठग सुरेश चंद्रशेखरसोबत अफेअर असल्याने ती चौकशीच्या फेऱ्यात अडकली होती. आता ती वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. जॅकलीनने न्यूयॉर्कमध्ये आयोजित 'भारत दिवस' परेडमध्ये सहभागी होत तिरंगा फडकावला आहे. लाल रंगाच्या साडीत ती अतिशय सुंदर दिसली आहे.

जॅकलीनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, 'न्यूयॉर्कच्या ४१ व्या भारत दिवस परेडमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद! माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण होता.' जॅकलीनने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तिच्या हातात तिरंगा आहे. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनचे सदस्य आणि इतर लोकांसोबत तिने फोटो पोस्ट केले आहेत. या खास कार्यक्रमात जॅकलीन अतिथी म्हणून सहभागी झाली.

जॅकलीन नुकतीच अक्षय कुमारच्या 'राम सेतू' सिनेमात दिसली. गेल्या वर्षी दिवाळीत हा सिनेमा रिलीज झाला होता. मात्र प्रेक्षकांच्या तो फारसा पसंतीस पडला नाही. आता चाहते तिच्या आगामी सिनेमांसाठी उत्सुक आहेत. जॅकलीन लवकरच सोनू सूदसोबत 'फतेह' आणि अक्षय कुमारच्या 'वेलकम 3' मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसबॉलिवूडअमेरिका