Join us

जिंकलस ! जॅकलिन फर्नांडिसने लाखो लोकांच्या मदतीसाठी असा घेतला पुढाकार, होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 4:35 PM

जॅकलिन फर्नांडिस बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळेला ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळेला ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने एका फाउंडेशनची स्थापना केली असून या चांगल्या आणि समाजोपयोगी कामासाठी जॅकलिनने अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत जोडून घेतले आहे; ज्या समाजाच्या हितासाठी अतिशय उपयुक्त असे काम समाजाच्या तळागाळात जाऊन काम करत आहेत. 

‘रोटी बँक’ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून, जॅकलिन या महिन्यात एक लाख लोकांपर्यंत जेवण पोहोचवणार असून फीलाइन फाउंडेशनसोबत, अभिनेत्रीने भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी एक उपक्रम सुरु केला आहे. त्यासोबतच, कोविड काळातील फ्रंट लाइन कार्यकर्ता मुंबई पोलिस दलाला मास्क आणि सॅनिटायझरचे देखील वितरण करण्यात येणार आहे.  

जॅकलिनने आपल्या सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट शेअर करताना लिहिले, आपल्याकडे एकच जीवन आहे, या जगात जे काही आपल्याला करता येईल ते केले पाहिजे. मला योलो फाउंडेशन लाँच केले, त्यावर गर्व आहे. चांगुलपणाच्या कथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एका फाउंडेशनची स्थापना केली आहे. या आव्हानात्मक काळात मी, योलो फाउंडेशनने प्रत्येक समाजसेवी संस्थांसोबत भागिदारी केली आहे. जे शक्य आहे ते सर्व आम्ही करतो. 

जॅकलिन फर्नांडीस कठीण काळात ज्यांना सर्वाधिक गरज होती त्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे राहिले आहे, मग ते पूरग्रस्तांच्या घरांचे पुनर्निर्माण असो की मुलांच्या पोषणासाठीचे कार्य, आपल्या सकारात्मक दृष्टीकोनासोबत, जॅकलीनने त्या लोकांमध्ये प्रेम आणि आनंद पसरवला आहे, ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज होती.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसकोरोना वायरस बातम्या