Join us

-अन् शॉर्ट वनपीसने केली जॅकलिन फर्नांडिसची फजिती, व्हायरल होतोय व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 17:19 IST

जॅकलिनचा हा व्हिडीओ जुना आहे. पण सध्या तो प्रचंड व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देवर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलिन फर्नांडीस आगामी भूत पोलीस,  बच्चन पांडे आणि  किक २  सारख्या सिनेमात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह दिसते आणि सतत ती फॅन्ससाठी वेगवेगळे फोटो-व्हिडीओज शेअर करत असते. जॅकलिन बॉलिवूडमधील मोजक्याच फिटनेससाठी  ओळखल्या जाणाऱ्याअभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या तिचा असाच व्यायाम करतानाचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. होय, वर्कआऊट करताना जॅकलिनला फजिती सहन करावी लागली. ती ऊप्स मोममेंटची शिकार ठरली. खरे तर जॅकलिनचा हा व्हिडीओ जुना आहे. पण सध्या का कुणास ठाऊक तो प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडीओत  जॅकलिन शॉर्ट वनपिस घालून योगा  करतेय आणि याचदरम्यान ती उप्स मोमेंटची शिकार होते. या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींना या व्हिडीओमध्ये काही गैर वाटत नाही तर काहींनी या व्हिडीओमुळे जॅकलिनवर टीका केली आहे\

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलिन फर्नांडीस आगामी भूत पोलीस,  बच्चन पांडे आणि  किक २  सारख्या सिनेमात दिसणार आहे. दरम्यान कोरोना काळत तिचे सलमान खानसोबतचे एक गाणंही रिलीज झाले होते. तसेच ती बरेच दिवस सलमान खानसोबत त्याच्या पनवेलमधील फार्म हाउसवरच मुक्कामी होती. तेव्हाचेही तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत. 

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस