Join us

जॅकलिन फर्नांडिसच्या हाती लागले 'हे' 3 बिग बजेट सिनेमा, या हिरासोबत पहिल्यांदाच करणार काम

By गीतांजली | Updated: November 6, 2020 16:37 IST

अभिनेत्री एका नव्हे तर दोन नव्हे तर बॅक टू बॅक तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या पुढच्या वर्षी बर्‍यापैकी व्यस्त असणार आहे कारण अभिनेत्री एका नव्हे तर दोन नव्हे तर बॅक टू बॅक तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे.  यावर्षी, कोरोना काळामुळे थिएटर बंद राहिले, त्यामुळे कोणताही चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकला नाही.  मात्र जॅकलिनचा मिसेस सीरियल किलर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. आता जॅकलिन तीन बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

 जॅकलिन 'भूत पोलीस', 'किक 2' आणि 'सर्कस' मध्ये दिसणार आहे.  नुकतेच 'भूत पोलीस'चे पोस्टरही रिलीज झाले. या हॉरर कॉमेडी चित्रपटात जॅकलिनसह सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  

पवन कृपलानी या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत.  'किक 2' मध्ये जॅकलिनबरोबर सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंदर रेड्डी करणार असून साजिद नाडियाडवाला याची निर्मिती करणार आहेत. 'सर्कस' मध्ये जॅकलिन रणवीर सिंग सोबत दिसले. रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार.

 तीन मोठे प्रोजेक्ट मिळाल्याने जॅकलिन खूप खूश आहे. याबद्दल बोलताना जॅकलिन म्हणाली, "मी खूप उत्साही आहे.  प्रत्येक चित्रपटाचे शैली खूप वेगळी असते, हा अनुभव सुपर थ्रिलिंग असणार आहे. पुढे ती म्हणाली, “यापूर्वी मी सलमान आणि सैफसोबतची कंपनी एन्जॉय केली आहे. मी रोहित शेट्टी आणि रणवीरसोबत पहिल्यांदाच काम करणार आहे, ते टॅलेंटचे पॉवरहाऊस आहेत आणि त्यांच्यासोबत शूट करण्यास खूप मजा येईल.  मला एका भूमिकेतून दुसर्‍या भूमिकेत जायला वेळ मिळणार नाही, पण ही माझी तक्रार नाही, कारण मी बॅक टू बॅक सिनेमांसह आनंदी जागेत असेल '.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिससलमान खानसैफ अली खान