Jagjit Singh Birth Anniversary : दिवंगत जगजीत सिंह हे गजलेच्या दुनियेतील बादशाह होते आणि नेहमीच राहतील. जगजीत सिंह यांनी त्यांच्या कोमल आवाजाने लोकांच्या मनात घर केलंय. त्यांचा आवाज लोकांना आनंद देतो आणि दु:खाचीही जाणीव करून देतो. त्यांची गाणी आजही लोक ऐकतात. ते भलेही आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या गजल त्यांची गाणी लोक नेहमीच ऐकतील. आज या महान गायकाची 82वी बर्थ अॅनिवर्सरी आहे. जगजीत सिंह यांनी देशाचं जगभरात गाजवलं. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
जगजीत सिंह हे कॉलेजच्या दिवसांपासून गजल गात होते. तेव्हापासूनच त्यांच्या फॅन्सची संख्या वाढत गेली. त्यांच्या आवाजाचे फॅन केवळ सामान्य लोकच नाही तर अनेक दिग्गजही होते. अनेकदा पाकिस्तानातही जगजीत सिंह यांच्यासाठी शो आयोजित केले जात होते. असाच एक पाकिस्तानातील त्यांच्यासोबतच एक किस्सा आम्ही सांगणार आहोत.
1979 मधील हा किसास आहे. जगजीत सिंह आणि त्यांची पत्नी चित्रा सिंह सोबत पहिल्यांदा पाकिस्तानात शो साठी गेले होते. बांग्लादेशवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं होतं. याचा तणाव अजूनही जारी होता. या तणावादरम्यान दोघेही पाकिस्तानात पोहोचले. तेव्हा त्यांना लोकांच्या वागण्यावरून समजत होतं की, त्यांच्यासोबत सामान्य व्यवहार केला जात नाहीये.
मागे लागला होता पाकिस्तानी गुप्तहेर
जगजीत सिंह आणि चित्रा सिंह यांना एक व्यक्ती दिसली होती. एअरपोर्टला पोहोचले तेव्हा ती व्यक्ती त्यांना दिसत होती. जगजीत सिंह यांना ती एक व्यक्ती पुन्हा पुन्हा दिसत होती. त्यामुळे त्यांना संशय आला होता. जेव्हा जगजीत सिंह आणि चित्रा सिंह हॉटेलवर पोहोचले तेव्हा थोड्या वेळाने रूमची बेल वाजली. जगजीत सिंह यांनी दरवाजा उघडला तर समोर तिच व्यक्ती उभी होती. जगजीत यांनी त्याला विचारलं की, 'आमच्यावर नजर ठेवत आहे का?'.
त्या व्यक्तीनेही 'हो' असं उत्तर दिलं. तो एक पाकिस्तानी गुप्तहेर होता. त्याने त्याच्याबाबत जगजीत सिंह यांना सांगितलं. जगजीत ते ऐकून हैराण झाले. पण जगजीत यांना धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याने सांगितलं की, तो त्यांचा मोठा फॅन आहे. इतकंच नाही तर जगजीत यांच्यासाठी तो एक गिफ्टही घेऊन आला होता. ती एक दारूची बॉटल होती. हा किस्सा “बात निकलेगी तो फिरः द लाइफ अॅन्ड म्यूजिक ऑफ जगजीत सिंह” मधून घेण्यात आला आहे.