‘जय भीम’ (Jai Bhim ) हा चित्रपट आठवत असेलच? तामिळ सुपरस्टार सूर्याचा हा सिनेमा दिवाळीच्या काळात ओटीटीवर रिलीज झाला होता आणि या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाचं सर्व स्तरातून कौतुक झालं. ‘जय भीम’ हा सिनेमा टीजे ज्ञानवेल (Tj Gnanavel ) यांनी दिग्दर्शित केला होता. हेच टीजे आता पुन्हा एक सत्यघटनेवर आधारित असलेला सिनेमा घेऊन येत आहे.टीजेंचा हा पहिला हिंदी चित्रपट असणार असून त्याचं नाव ‘डोसा किंग’ (Dosa King)असणार आहे. गेल्यावर्षी जुलै या सिनेमाची घोषणा झाली होती. हा चित्रपट जीवाज्योती संतकुमार या महिलेच्या आयुष्यावर आधारित आहे.
काय असेल कहाणी?‘डोसा किंग हा चित्रपट जीवाज्योती संतकुमारच्या आयुष्यावर बेतलेला आहे. जीवाज्योतीने जगातील सर्वात मोठ्या साऊथ इंडियन रेस्तरां चेनचा मालक पी. राजगोपाल याच्याशी कायदेशीर लढाई लढली. रेस्तरां चेन ‘सवर्णा भवन’चा मालक पी. राजगोपाल एकेकाळी जीवाज्योती संतकुमारसोबत लग्न करू इच्छित हातो. जीवाज्योती ही पी राजगोपाल यांच्या एका कर्मचाºयाची पत्नी होती. जीवाज्योतीने या लग्नासाठी नकार देताच पी राजगोपाल यांनी तिला तिच्या पतीच्याच हत्येच्या प्रकरणात अडकवलं. यानंतर 18 वर्षाची कायदेशीर लढाई लढत जीवाज्योतीने स्वत:ला निर्दोष सिद्ध केलं. सर्वोच्च न्यायालयाने जीवाज्योतीची निर्दोष सुटका करत पी. राजगोपालला जन्मठेप सुनावली. शिक्षेचा काही काळ भोगल्यानंतर पी राजगोपालचं हृदयविकाराच्या धक्क्याने जुलै 2019 मध्ये निधन झालं.याच सत्यघटनेवर टीजे ‘डोसा किंग’ नावाचा सिनेमा बनवणार आहे.
काय म्हणाले टीजेया केसवर मी खूप वर्षांपासून काम करतोय. मी पत्रकार होतो, तेव्हापासून मी हे केस फॉलो अरतोय. जीवाज्योतीची कायदेशीर लढाई पडद्यावर दाखवण्यात मी यशस्वी होईल, अशी मला आशा आहे, असं टीजे म्हणाले.