Join us

‘जय लव कुश’च्या प्रीमिअरमुळे ‘झी सिनेमा’वर तिहेरी मनोरंजनाचा धमाका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 4:27 AM

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात; आणि ही गोष्ट माणसांनाही लागू होते.प्रत्येक व्यक्तीत काही चांगली आणि वाईट अशी बाजू असतेच.एकाच ...

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात; आणि ही गोष्ट माणसांनाही लागू होते.प्रत्येक व्यक्तीत काही चांगली आणि वाईट अशी बाजू असतेच.एकाच घरातील तिळ्यांना वेगवेगळी वागणूक दिली जाते, तेव्हा मोठेपणी त्यांच्यातील एकजण रावण होईल आणि मग सुष्ट-दुष्टांमध्ये संघर्ष होईल, यात काहीच शंका नाही. 'जय लव कुश' या चित्रपटाची कथा नाट्य,अॅक्शन आणि मनोरंजनाने भरलेली आहे. टेम्पर, नन्नकू प्रेमथो आणि जनता गॅरेज या तीन सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका रंगविल्यानंतर जय लव कुश हा ज्युनियर एनटीआरचा (ज्युनियर एन. टी. रामा राव) चौथा हिट चित्रपट आहे. यात त्याने प्रथमच तिहेरी भूमिका रंगविली आहे. या चित्रपटाद्वारे बॉलीवूडचा अभिनेता रोनित रॉय टॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकरली आहे. याशिवाय या चित्रपटात राशी खन्ना, निवेता थॉमस आणि अभिमन्यू सिंह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.‘ब्लॉकबस्टर चित्रपटांचे चॅनल’ असलेल्या ‘झी सिनेमा’वर 'जय लव कुश' या चित्रपटाचा प्रीमिअर रविवार, 13 मे रोजी दुपारी 12.00 वाजता प्रसारित होणार आहे.या चित्रपटात ज्युनियर एनटीआरने तीन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा लीलया साकारल्या असून त्यातील जय ही व्यक्तिरेखा खलनायकी स्वरूपाची असून तो विविध रूपे घेण्यात पटाईत असतो.'लव' हा साधा आणि आदर्शवादी माणूस असून कुश हा मिश्कील स्वभावाचा पण दुसऱ्याला हातोहात बनविणारा असतो.चित्रपटाची कथा अतिशय सशक्त आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याने हा एक उत्तम कौटुंबिक करमणूकप्रधान चित्रपट बनला आहे. चित्रपटाला पुरस्कारविजेत्या देवी श्री प्रसाद यांचे ठेकेदार संगीत लाभले असून त्यात अभिनेत्री तमन्ना भाटिया ही ‘स्विंग जरा’ या खास आयटम गीतात प्रेक्षकांना दर्शन देईल.जय, लव आणि कुश या तिळ्यांचे संगोपन त्यांचा मामा करतो आणि तो त्यांना रंगभूमीवर अभिनय करण्याचे प्रशिक्षण देऊन तयार करतो. यात लव आणि कुश उत्तम अभिनय शिकतात, पण जयच्या काहीशा अडखळत बोलण्यामुळे मामा त्याला बाजूला सारतो. जयला बहुतेक वेळा घरीच ठेवले जाते आणि त्याला घरातील कामे करण्यास सांगितले जाते.या अपमानकारक वागणुकीमुळे संतापलेला जय एके दिवशी रंगमंचाला आग लावतो आणि घरातून पळून जातो. या आगीमुळे या तिन्ही भावांची ताटातूट होते आणि ते वेगवेगळ्या गावी लहानाचे मोठे होतात.योगायोगाने लव आणि कुश एकमेकांना भेटतात आणि आपली अडचण लपविण्यासाठी एकमेकांच्या जागा बदलतात.पण त्यांच्यापुढे अशी कोणती आपत्ती असते? त्यांच्या या अडचणीमुळेच आता मोठा माफिया डॉन बनलेल्या जय ऊर्फ रावणचे त्यांच्याकडे लक्ष जाते आणि त्यानंतर काय घडते, ते प्रत्यक्षच पाहायला मिळणार आहे.