Join us

Janhavi Kapoor : बॉयफ्रेंडसोबत दिसली, कॅमेरा पाहताच लाजली; जान्हवी कपूरचे नखरे बघा !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 4:41 PM

जान्हवी आणि शिखर या कथित कपलचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Janhavi Kapoor : सध्या बीटाऊनमध्ये रिलेशनशिप, अफेअरच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. यात स्टारकिड्सच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. अभिनेत्री जान्हवी कपूर याच कारणामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया (Shikhar Pahariya) यांच्याकडे नेटकऱ्यांचे लक्ष आहे. नुकतेच मुकेश अंबानी यांनी दिलेल्या एका पार्टीत जान्हवी कपूर पिंक साडीत पोहोचली. तर आधीच आतमध्ये असलेला शिखर पहाडिया तिला न्यायला बाहेर आलेला दिसला. दोघांना एकत्र पाहून नेटकऱ्यांचे लगेच त्याकडे लक्ष गेले. फोटोग्राफर्सने लगेच त्यांना कॅप्चर केले. आता या लव्ह बर्ड्सचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. 

कॅमेरा बघून जान्हवी कपूर लाजली

नुकताच जान्हवी आणि शिखर या कथित कपलचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोघेही एका कारमध्ये असून शिखर गाडी चालवत आहे. जान्हवी कपूर कॅमेऱ्याला बघून लाजताना दिसत आहे. तर दोघेही एकमेकांशी हसत हसत गप्पा मारताना दिसत आहेत. जान्हवीने फुल स्वेटशर्ट घातलेला दिसतोय तर शिखर कॅज्युअल लुकमध्ये दिसत आहे. दोघेही अनिल कपूरची लेक रिया कपूरच्या घरुन निघाले आहेत.

शिखर आणि जान्हवीचे मध्यंतरी ब्रेकअप झाले असल्याच्या चर्चा होत्या. यानंतर जान्हवी तिचा मित्र ओरीसोबत जास्त दिसत होती. त्यामुळे ओरी आणि जान्हवीचे अफेअर सुरु असल्याची चर्चा रंगली. मात्र आता पुन्हा चोरी छुपे जान्हवी आणि शिखरची गाठभेट कॅमेऱ्यात कैद होत आहे. इतकंच नाही तर जान्हवीने पोस्ट केलेल्या एका फोटोवर शिखरने माय स्वीटहार्ट अशी कमेंटही केली होती. यानंतर या चर्चा आणखीनच जोरात रंगल्या.

शिखर आणि जान्हवीच्या अफेअरची चर्चा तेव्हा रंगली होती जेव्हा जान्हवी आणि त्याचे काही खाजगी फोटो व्हायरल झाले होते. शिखर हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. २०१६ मध्ये दोघांची फार चर्चा झाली होती. कारण त्यांची किसींग करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. 

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांमध्ये बिनसलं होतं. त्यानंतर दोघे वेगळे झाले होते. आता जान्हवी आपल्या करिअरकडे लक्ष देत आहे. तर शिखरही तिच्या आयुष्यात परत आल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :रिलेशनशिपजान्हवी कपूरसुशीलकुमार शिंदेसोशल मीडिया