Join us

Happy Birthday Janhavi Kapoor : 'बऱ्याच संधी आल्या पण आदर नाही मिळाला', असं का म्हणाली जान्हवी कपूर?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 11:24 AM

अभिनेत्री जान्हवी कपूर एका मुलाखतीत करिअरविषयी बोलताना म्हणाली... ..

श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूर (Boney Kapoor) यांची लेक अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आज २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. जान्हवीने 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. फिल्मी फॅमिली बॅकग्राऊंडमधून आली असली तरी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी स्ट्रगल करावाच लागतो असं जान्हवीने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.

संधी मिळाल्या पण 'इज्जत' अजून मिळाली नाही

जान्हवीने एका मुलाखतीत तिच्या फिल्मी करिअरवर दिलखुलासपणे भाष्य केलं. ती म्हणाली,'मला वाटतं कोणत्याही चित्रपटात मी जबरदस्ती असणं हे माझा स्वाभिमान दुखावणारे आहे. माझ्याकडे देण्यासाठी खूप काही आहे आणि मी स्वत:ला सिद्ध करु इच्छिते. मी नवे आव्हानं पेलू शकते. आणि त्यात यशही मिळवू शकते.कधी कधी वाटतं मला अनेक संधी मिळाल्या पण आदर अजूनही मिळाला नाही.'

जान्हवीने यावेळी इशाऱ्याने सांगितले, 'मी स्वत:च्या नजरेत त्याच (आदर) एका गोष्टीसाठी काम करत आहे. यासाठी बराच वेळ लागतो आणि शून्यापासून सुरुवात करावी लागते.'

ती पुढे म्हणाली, 'नेपोटिझममुळे या विचारसरणीमुळे उलट मला आणखी मेहनत करावी लागते. मला अनेकदा भीती वाटते. आईच्या निधनानंतर तर मी खूप खचले होते. कॅमेऱ्यासमोर यायला मला मानसिक तयारी करावी लागत होती.'

Janhavi Kapoor:जान्हवी कपूर होणार माजी मुख्यमंत्र्यांची नात सून? बॉयफ्रेंड आणि वडिलांसोबत गेली व्हॅकेशनवर

जान्हवीचा नुकताच 'मिली' (Mili) हा सिनेमा रिलीज झाला. सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. वडील बोनी कपूर यांनीच सिनेमाची निर्मिती केली होती. आता जान्हवी वरुण धवन (Varun Dhawan) सोबत 'बवाल'(Bawal) सिनेमात दिसणार आहे. तसेच जान्हवी तिच्या लव्हलाईफ मुळेही चर्चेत असते. ती सध्या माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया (Shikhar Pahariya) सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

टॅग्स :जान्हवी कपूरसिनेमामुलाखतश्रीदेवीबोनी कपूर