बॉलिवूडची धडक गर्ल जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) प्रोफेशनल लाइफसोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. तिने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. दरम्यान ती सतत आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. नुकतीच जान्हवी एक्स बॉयफ्रेंडसोबत सतत दिसून येत आहे. त्यामुळे या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला आहे. जान्हवी पुन्हा एकदा शिखर पहाडियासोबत व्हेकेशनवर जाताना दिसून आली.
जान्हवी कपूरचे नाव अनेकदा ओरीसोबत जोडले जात होते. मात्र ते दोघे फक्त चांगले मित्र असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान जान्हवी कपूर आता पुन्हा एकदा आपल्या एक्स-बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.ती सतत एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत फिरताना दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यात जान्हवी कपूर शिखर पहाडियासोबत सहभागी झाली होती. तसेच अनेकवेळा कारमधून जाताना आणि पार्ट्यांना जाताना या दोघांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा जान्हवी आणि शिखरला विमानतळावर स्पॉट करण्यात आले. विशेष म्हणजे या दोघांसोबत बोनी कपूरसुद्धा होते. त्यामुळे वडिलांनी जान्हवी आणि शिखरच्या नात्याला मंजुरी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.