अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) तिच्या करिअरला नुकतीच सुरूवात केली असली आणि मोजकेच सिनेमे केले असले तरी तिची लोकप्रियता एखाद्या मोठ्या स्टारसारखी आहे. तिच्या सौंदर्याने फॅन्सवर मोहिनी घातली आहे. फॅन्स तिला खूप पसंत करतात. महत्वाची बाब म्हणजे आई श्रीदेवीचा चार्मही तिच्यात झळकतो. तिने फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या तिचं एक फोटोशूट फारच व्हायरल झालं आहे. या फोटोशूटचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. ज्यात तिने अशा काही पोज दिल्या आहे की, बघून फॅन्सची बोलती बंद झाली आहे.
या फोटोशूट व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर बॅकलेस टॉपसोबत शॉर्ट स्कर्टमध्ये दिसत आहे. आपला लूक आणखी ग्लॅमरस करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहेत. सोबतच लाइट मेकअप केलंय.
जान्हवी कपूरने या व्हिडीओत इतका जास्त डिपनेक टॉप घातला आहे की, तिचा बोल्ड अंदाज पाहून फॅन्सची झोप उडाली असणार. इतकंच नाही तर फोटोसाठी तिने एकापेक्षा एक भारी पोजही दिल्या आहेत. जान्हवी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. सतत ती तिचे फोटो फॅन्ससाठी शेअर करत असते. ज्यावर लाइक्स आणि कमेंट्सा पाऊस पडत असतो. इतकंच नाही तर अनेक सेलिब्रिटीही तिच्या फोटोंवर कमेंट्स करत असतात.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जान्हवी कपूर 'रूही' मध्ये दिसली होती. ज्यात ती राजकुमार राव आणि वरूण शर्मासोबत दिसली होती. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार जास्त कमाल दाखवू शकला नाही. सध्या जान्हवी कपूर हातात एकापेक्षा एक भारी सिनेमे आहेत. ज्यात 'दोस्ताना 2', 'मिस्टर एंड मिसेज माही', 'रणभूमि', 'गुड लक जेरी' आणि 'तख्त' या सिनेमांचा समावेश आहे.