अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) बॉलिवूडमध्ये हळहळू आपले पाय रोवत आहे. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'बवाल' सिनेमातील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. स्टारकिड असल्याने ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने लहानपणीपासूनच कॅमेरा कसा जीवनाचा भाग राहिला आहे हे सांगितले. कित्येक लोक परवानगी न घेता थेट तिचे फोटो काढायचे. एकदा तर तिचा फोटो मॉर्फ करुन अडल्ट साईटवर टाकण्यात आला होता. याचा वाईट अनुभव तिने सांगितला आहे.
जान्हवी कपूर म्हणाली,' कॅमेरा नेहमीच माझ्या जीवनाचा भाग राहिला आहे. लहानपणी जेव्हा आम्ही बाहेर जायचो तेव्हा पापाराझी आमचे फोटो काढायचे. मी चौथीत असताना आमचा माझा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. मी कम्प्युटर लॅबमध्ये प्रवेश केला तेव्हा क्लासमेट्सच्या स्क्रीनवर माझा फोटो होता.'
ती पुढे म्हणाली, 'मी त्या फोटोंमध्ये खूपच असहज दिसत होते. बिना मेकअप फोटो पोस्ट करत मी फिल्म इंडस्ट्रीत लाँच होत आहे असंही लिहिलं होतं. मला त्या फोटोमुळे प्रसिद्धी तर नाही मिळाली पण शाळेत मला सगळ्यांनी दूर केलं. माझे मित्र माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. वॅक्स न केल्यामुळे मला खूप चिडवलं गेलं.'
जान्हवी म्हणाली की टीएनएजमध्ये असताना अनेक अडल्ट साईटवर तिचे मॉर्फ्ड फोटो होते. सध्या तर AI मुळे अशा प्रकाराची संख्या वाढली आहे. असे फोटो लोकांना खरे वाटू लागले आहेत. जान्हवी लवकरच राजकुमार रावसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही' मध्ये दिसणार आहे. याशिवाय 'देवरा' आणि 'उलझ' हे चित्रपटही रांगेत आहेत.