जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना भावली आहे. सध्या ती करण जोहरचा आगामी चित्रपट 'तख्त'मध्ये काम करते आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल अद्याप काही समजू शकलेले नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार करण जोहर बायोपिक चित्रपट बनवणार असून त्यात जान्हवी पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.
निर्माता करण जोहर आता बायोपिक बनवणार असून त्यासाठी त्याने या कथेसाठीचे हक्कही विकत घेतले आहेत. देशातील पहिल्या लढाऊ विमानाच्या पहिल्या पायलट गुंजन सक्सेनाच्या जीवनावर हा सिनेमा आधारलेला असणार आहे. गुंजन सक्सेना यांनी १७ वर्षांपूर्वी भारत पाकिस्तान दरम्यानच्या कारगिल युद्धामध्ये सहभाग घेतला होता.१९९४ साली २५ महिलांना भारतीय वायुदलामध्ये पायलट बनण्याची संधी मिळाली होती. त्यापैकी एक गुंजनना ट्रेनी पायलट बनण्याची संधी मिळाली होती. त्या रोलसाठी करण जोहरने जान्हवी कपूरची निवड केली आहे. जान्हवीची मानसिक तयारीही करणने करून घेतली आहे. गुंजन सक्सेनाचा रोल साकारण्याची क्षमता जान्हवी कपूरमध्ये आहे, असे करण जोहरला वाटते. या भूमिकेला जान्हवी किती न्याय देते, हे पाहावे लागेल. 'तख्त'मध्ये रणवीर सिंगच्या अपोझिट जान्हवी कपूरला कास्ट करण्यात आले आहे. पहिल्यांदाच जान्हवी आणि रणवीरची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आलिया भट्टची विकी कौशलसोबत जोडी जमणार आहे.‘तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल