दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर लवकरचं बॉलिवूडच्या जगात पाऊल ठेवतेय. करण जोहर निर्मित ‘धडक’ या चित्रपटातून तिचा ग्रॅण्ड डेब्यू होतोय. साहजिकचं चाहत्यांना जान्हवीबद्दल प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. आज आम्ही जान्हवीच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. जान्हवी किती शिकलीयं, याचा खुलासा जान्हवीने स्वत:चं एका मुलाखतीत केला. ‘मी १२वी पर्यंत शिकलेय. इंटरनॅशनल बोर्डमध्ये माझे शिक्षण झालेय. लहानपणापासून मी मम्मी-पापासोबत खूप फिरले. अगदी जगभर फिरले. जगभर फिरत असताना मी खूप काही शिकले. अर्थात यामुळे माझी शाळा बुडायची. वर्गात दरवर्षी माझी केवळ ३० टक्केच उपस्थिती असायची. इतिहास व इंग्रजी हे माझे आवडते विषय होते. ’ असे जान्हवीने या मुलाखतीत सांगितले.
मला काय बनायचे, याचा निर्णय मी खूप लहान वयातचं घेतला होता. मला अभिनयचं करायचा होता, असेही जान्हवीने सांगितले. जान्हवीचा डेब्यू सिनेमा ‘धडक’ हा ‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे , हे आपण जाणतोच. ‘झिंग झिंग झिंगाट’च्या तालावर या ‘सैराट’ने सिने रसिकांना अक्षरशा: याड लावलं. या सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही ‘सैराट’ने सगळे रेकॉर्ड मोडले. पण निश्चितपणे ‘सैराट’पेक्षा ‘धडक’चा बाज वेगळा आहे.राजस्थानी पार्श्वभूमीवर साकारलेला हा चित्रपट येत्या २० तारखेला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. जान्हवीसोबत ईशान खट्टर यात मुख्य भूमिकेत आहे. तूर्तास जान्हवी आणि ईशान हे दोघेही ‘धडक’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत.