Join us

जान्हवी कपूरने तिच्या कुटुंबाविषयी सांगितले हे सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 10:23 AM

धडक नंतर जान्हवी करण जोहरच्या तख्त या चित्रपटात झळकणार आहे. जान्हवी आज अभिनेत्री बनली असली तरी ती आजही प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या कुटुंबियांकडून सल्ला घेते.

ठळक मुद्देजान्हवी तिच्या लूक्सच्या बाबतीत खूपच अलर्ट असते. तिने घातलेले कपडे तिला चांगले वाटत आहेत का नाहीत याविषयी ती तिच्या भाऊ-बहिणींना आणि वडील बोनी कपूर यांना आवर्जून विचारते. या भावंडांचा आणि बोनी कपूर यांचा एक व्हॉटसअॅप ग्रुप असून या ग्रुपमध्ये ती कुठेही जायच्या आधी तिचे फोटो पोस्ट करते आणि तिच्या कुटुंबियांची तिच्या लुक्सबाबत प्रतिक्रिया विचारते.

जान्हवी कपूरने धडक या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. तिला पहिल्याच चित्रपटात प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून तिच्या फॅन फॉलॉव्हिंगमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. धडक नंतर जान्हवी करण जोहरच्या तख्त या चित्रपटात झळकणार आहे. जान्हवी आज अभिनेत्री बनली असली तरी ती आजही प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या कुटुंबियांकडून सल्ला घेते.

जान्हवी कपूरसाठी तिचे कुटुंब हे खूप महत्त्वाचे आहे. तिच्या आयुष्यात तिच्या कुटुंबियांसाठी एक खास जागा असल्याचे ती नेहमीच सांगते. तिची आई अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवी आणि तिची बहीण खुशी कपूर पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या. त्यांना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी तिचा सावत्र भाऊ अर्जुन कपूर आणि बहीण अंशुला कपूर यांनी त्यांना खूप मदत केली. या चारही भावंडांमध्ये आता एक खूप छान बॉण्डिंग तयार झाले आहे. ते अनेकवेळा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. त्यांच्या कुटुंबातील एक सिक्रेट नुकतेच जान्हवीने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे. 

जान्हवी तिच्या लूक्सच्या बाबतीत खूपच अलर्ट असते. तिने घातलेले कपडे तिला चांगले वाटत आहेत का नाहीत याविषयी ती तिच्या भाऊ-बहिणींना आणि वडील बोनी कपूर यांना आवर्जून विचारते. या भावंडांचा आणि बोनी कपूर यांचा एक व्हॉटसअॅप ग्रुप असून या ग्रुपमध्ये ती कुठेही जायच्या आधी तिचे फोटो पोस्ट करते आणि तिच्या कुटुंबियांची तिच्या लुक्सबाबत प्रतिक्रिया विचारते.

याविषयी जान्हवी सांगते, डॅडस किड्स नावाचा आमचा व्हॉटसअॅप ग्रुप असून यात माझे बाबा, मी, खुशी, अंशुला दिदी आणि अर्जुन भैय्या आहोत. मी माझ्या आऊटफिटचे फोटो, तसेच वेगवेगळ्या फोटोशूटचे फोटो या ग्रुपमध्ये पाठवत असते. माझे आऊटफिट चांगले वाटत आहेत का हे मी माझ्या वडिलांना आवर्जून विचारते. त्यांना आऊटफिट चांगले वाटले तरच मी त्यात कर्म्फटेबल असते असे मला वाटते. माझ्या वडिलांचा आणि भावंडाचा सल्ला माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो.  

 

टॅग्स :जान्हवी कपूरअर्जुन कपूरबोनी कपूरखुशी कपूर