Join us  

भर कार्यक्रमात Orhan Awatramaniच्या हातात हात घालून Janhvi kapoorने दिल्या पोझ, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 3:45 PM

Janhvi kapoor: या संपूर्ण इव्हेंटमध्ये सगळ्यांचं लक्ष फक्त जान्हवी व तिच्यासोबत असलेल्या तरुणानं वेधलं.

Janhvi Kapoor Photo From A Event With Orhan Awatramani:जान्हवी कपूर (janhvi Kapoor) चित्रपट आणि अभिनयापेक्षा तिच्या लूक आणि फॅशन सेन्समुळे जास्त चर्चेत असते. मंगळवारी जान्हवी फेमिना ब्युटी अवॉर्ड्समध्ये निऑन मर्मेड गाउनमध्ये पोहोचली होती. जिथे तिनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या इव्हेंटमध्ये तिच्या  लूकची सगळीकडेच चर्चा आहे. तिचा खास मित्र ओरहान अवत्रामणी(Orhan Awatramani) चा हातात हात घालून मीडियाच्या कॅमेऱ्यात स्पॉट झाली आणि सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. एवढेच नाही तर जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनले आहेत.

फिशकट गाउनमध्ये जान्हवी कपूर एखाद्या जलपरीपेक्षा दिसत होती. ओरहान अवत्रामणीने आणि जान्हवी कपूरची जोडी छान दिसत होती.  जान्हवी ओरहानसोबत दिसली तेव्हा प्रत्येक वेळी तो तिचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा होते, मात्र एकदा अभिनेत्रीने या चर्चांवर मौन सोडले आणि सांगितले की ओरहान फक्त तिचा खूप चांगला मित्र आहे. आता या दोघांचा हा फोटो पाहून प्रत्येकाच्या मनात हे नक्की येणार आहे की ते खरच फक्त चांगले मित्र आहेत की यांचं नात यापलीकडेच आहे. 

ओरहान हा एक मुंबई बेस्ड सोशल एक्टिव्हिस्ट आहे. त्याने सारासोबत कोलंबिया युनिव्हर्सिटीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याला प्रोफेशनल ऍनिमेटर व्हायचं आहे. सारा अली खान, जान्हवी कपूर, खुशी कपूर, काजोल आणि अजय देवगण यांच्या मुलीसोबत पार्टी करतानाचे ओरहानचे सर्व फोटो समोर आले आहेत. त्याचे बॉलिवूड सेलेब्रेटीजच नव्हे तर हॉलिवूड सेलिब्रेटीसुद्धा खास मित्र आहेत. त्याचे किम कर्दाशियन आणि तिच्या बहिणीसोबत चांगले संबंध आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर शेवटची 'मिली' चित्रपटात दिसली जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. याशिवाय ती राजकुमार रावसोबत तिच्या 'बावल' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटांमध्ये वरुण धवनसोबत दिसणार आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटी