Join us

जान्हवी कपूरला स्टारकिड असल्याचा होतोय पश्चाताप?, म्हणाली - 'माझं नुकसान झालं कारण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 5:14 PM

Janhvi Kapoor:जान्हवी कपूर बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 'मिली', 'गुडलक जेरी', 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' यांसारख्या चित्रपटांतून तिने आपला अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. ती तिच्या चित्रपटांसाठी कठोर परिश्रम करण्यास मागे हटत नाही. पण, यानंतरही ती अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलच्या निशाण्यावर असते. अलीकडेच जान्हवीने एक खंत व्यक्त केली. जान्हवी म्हणते, 'लोकांना वाटते की स्टार किड असल्याने मला सोप्या संधी मिळतात, पण त्यामुळे माझे खूप नुकसान झाले आहे.'

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान जान्हवी कपूरने तिच्या करिअरबद्दल सांगितले. ती म्हणाली की जेव्हा ती तिच्या पात्रासाठी कठोर परिश्रम घेत असते, मानसिक अस्वस्थतेतून जात असते आणि मग इंटरनेटवर कोणीतरी तिच्या अभिनय कौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करते किंवा 'नेपोटिज्मवाली मुलगी...' अशी टीका करतात तेव्हा खूप त्रास होतो.जान्हवी कपूर म्हणाली, 'लोकांचा असा अंदाज आहे की मला सर्वकाही सहज मिळाले आहे. पण, मेहनत करणे हे माझे प्राधान्य आहे. मी माझ्या आयुष्यातील ध्येयांबद्दल खूप स्पष्ट आहे. मला माझ्या आईचा वारसा पुढे न्यायचा आहे. ही अभिमानाची गोष्ट नाही तर माझी इच्छा आहे. 

जान्हवी कपूर पुढे म्हणाली की, लोकांना तुम्हाला नाकारायला फक्त एक सेकंद लागतो. ती म्हणाली, 'कदाचित काही संधी माझ्याकडे सहज आल्या असतील. पण, लोक तटस्थपणे माझे चित्रपट पाहायला जात नसल्यामुळे माझे नुकसान झाले आहे, असे मला वाटते. लोक मला प्रिवलेज्ड म्हणतात. जान्हवी म्हणाली, 'जे माझ्या मेहनतीकडे दुर्लक्ष करतात त्यांना मी फक्त हेच सांगू इच्छिते की मी कठोर परिश्रम करते. माझ्याकडे जे आहे त्याचा मी आदर करते. मला सिनेमा आवडतो मी याबद्दल दु:खी नाही, कारण मला माहित आहे की मी जे करत आहे ते मी चांगले करत आहे.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती लवकरच दोस्ताना २, बवाल, मिसेस माही आणि मिस्टर या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूर