बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून सध्या जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ट्रेंडिंगमध्ये आहे. तिच्या सोशल मीडियावरील फोटोशूट्सने तर धुरळा उडवला आहे. प्रोफेशनल आणि वैयक्तिक अशा दोन्ही कारणांमुळे ती चर्चेत असते. जान्हवी शिखर पहाडियाला (Shikhar Pahariya) डेट करत आहे. दोघांचं मध्यंतरी ब्रेकअप झालं होतं. मात्र आता ते परत सोबत आले आहेत. शिखर मोठा उद्योगपती असून तो माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचा नातू आहे. शिखरचा भाऊ वीर पहाडियाने नुकतंच त्याच्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. यावर होणारी सून जान्हवीची कमेंट चर्चेत आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना प्रणिती, स्मृती आणि प्रिती अशा तीन मुली आहेत. त्यातील स्मृती शिंदे यांनी उद्योगपती संजय पहाडियासह लग्न केले. त्यांचाच शिखर हा मुलगा आहे. शिखर हा बोनी कपूर यांच्या कुटुंबाच्या अगदी जवळचा आहे. श्रीदेवी यांच्या निधनावेळीही तो जान्हवीच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभा होता. बोनी कपूर यांनीही शिखरविषयी बोलताना त्याने कायमच आम्हाला मदत केली आहे असे म्हटले होते. शिखर आणि जान्हवी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. त्यांचं रिलेशनशिप आता लपून राहिलेले नाही. जान्हवी शिखरसोबत अनेकदा तिरुपती मंदिरात दर्शनाला जाते. शिवाय दोघंही पार्टी असो किंवा इव्हेंट सोबत दिसतात. आता नुकतंच शिखरचा भाऊ वीरने त्याच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आईसोबताच सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर जान्हवीच्या कमेंटने लक्ष वेधून घेतले आहे. 'बेस्ट पीपल' असं लिहित तिने हार्ट इमोजी शेअर केला आहे. यावरुन होणाऱ्या सासू आणि दीरासोबत जान्हवीचं बाँडिंग चांगलं दिसतंय हेच स्पष्ट होतं.
काही दिवसांपूर्वी झालेल्या 'कॉफी विद करण' शोमध्ये जान्हवीने शिखर पहाडियाचं नाव घेतलं होतं. तिने शिखरची खूप स्तुती केली होती. जेव्हा दोघांचं ब्रेकअप झालं होतं तेव्हा शिखर मात्र जान्हवीचीच वाट पाहत होता. तो तिला 'नादान परिंदे घर आजा' असं म्हणत परत यायला सांगायचा. जान्हवीलाही काही वर्षांनी त्याच्या प्रेमाची जाणीव झाली आणि त्यांच्यात पॅचअप झालं. आता दोघं कधी लग्न करतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
जान्हवी कपूर लवकरच तेलुगू डेब्यू करणार आहे. ज्युनिअर एनटीआरसोबत ती 'देवारा' सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यामध्ये सैफ अली खान खलनायकाची भूमिका साकारणार आहे.