Join us

जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 12:08 PM

जान्हवी खऱ्या आयुष्यात खूप धार्मिक आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या सिनेसृष्टीत आघाडीवर आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही',' उलझ', 'देवरा पार्ट १' असे एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमात तिने काम केलं. लवकरच ती रामचरणसोबत 'RC16' सिनेमात दिसणार आहे. जान्हवी खऱ्या आयुष्यात खूप धार्मिक आहे. अनेकदा ती तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाते. तर आता नुकतंच तिने अंजनेय स्वामी मंदिरात जाऊन पूजा केली आहे. तेथील तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

जान्हवी कपूरने गुरुवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी ती जमिनीवर बसलेली होती तर तिच्या बाजूला एक महिला आणि छोटी मुलगी दिसत आहे. आजूबाजूला पुजारी आहेत आणि मंत्रपठण सुरु आहे. जान्हवीने साधा ड्रेस परिधान केला असून भगव्या रंगाचं उपरणं घेतलं आहे. पुजाऱ्यांसोबत तिचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुमारे अर्धा तास जान्हवी मंदिरात बसून होती आणि तिने विधीवत पूजा अर्चना केली. तिच्यासोबत दाक्षिणात्य फिल्ममेकर बुची बाबू सानाही दिसत आहेत.

जान्हवी नुकतीच 'देवरा पार्ट १' सिनेमात दिसली. या सिनेमातून तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिने सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर केली. सिनेमाच्या दुसऱ्या भागातही ती दिसणार आहे. यानंतर जान्हवी RC16, सनी संस्कारी की तुलसी कुमारी सिनेमात दिसणार आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरमंदिर