जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. जान्हवी कपूरने 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पुढे विविध बॉलिवूड सिनेमांमधून जान्हवी झळकत राहिली. इतकंच नव्हे आता 'देवरा' सिनेमाच्या माध्यमातून जान्हवी साऊथ इंडस्ट्री सुद्धा गाजवायला सज्ज आहे. जान्हवी कपूरच्या नव्या सिनेमाचा टिझर आज रिलीज झालाय. या सिनेमाचं नाव आहे 'उलझ'.
'उलझ'च्या टिझरमध्ये बघायला मिळतं की, जान्हवी कपूर सिनेमात IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफीसरची भूमिका साकारत आहे. सुहाना असं जान्हवीच्या भूमिकेचं नाव आहे. भारतातर्फे सुहाना एजंट बनून एका सिक्रेट मिशनमध्ये तैनात असते. पण या मिशनमध्ये ती यशस्वी होते की अडकते, अशा कहाणीची छोटीशी झलक 'उलझ' च्या ट्रेलरमध्ये बघायला मिळते.
देशभक्तीने प्रेरित 'उलझ'ची कथा खुपच खास आहे. जान्हवी कपूर सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकत आहे. तिचा ॲक्शनपॅक अंदाज आणि जबरदस्त अभिनय पाहायला मिळतोय. जान्हवी कपूरसोबत या सिनेमात गुलशन देवियाह, राजेश तेलंग, रोशन मॅथ्यू, आदिल हुसेन हे लोकप्रिय कलाकार झळकत आहेत. सुधांशु सरिया यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. ५ जुलैला सिनेमा लोकांच्या भेटीला येतोय.