यंदा बदलणार जानेवारीची अनलकी इमेज ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:07 AM
बॉलिवूडच्या चित्रपटातून अंधश्रद्धेच्या विरोधात जागर केला जातो. अनेक आधुनिक विचारांची पायाभरणी केली जाते. अनावश्यक चाली-रिती व परंपरांवर क ठोर ...
बॉलिवूडच्या चित्रपटातून अंधश्रद्धेच्या विरोधात जागर केला जातो. अनेक आधुनिक विचारांची पायाभरणी केली जाते. अनावश्यक चाली-रिती व परंपरांवर क ठोर प्रहार करण्याचे कामही केले जाते. मात्र चित्रपटाचा मुहरूत किंवा प्रदर्शनाची तारीख ठरविताना मात्र तारखांचा मेळ पंचागातून साधला जातो. काही स्टार यश मिळविण्यासाठी नावात बदल करतात तर काहींना आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी जानेवारी महिना अनलकी वाटतो. वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्याने होणार हे निश्चित असताना तो कमनिशिबी कसा असणार? तरी देखील जानेवारी महिन्यात मोठे चित्रपट प्रदर्शित केले जात नाहीत. काहींच्या मते जानेवारीत प्रदर्शित होणारे चित्रपट फ्लॉप ठरतात. मात्र प्रत्येकच वेळी असे होत नाही.. काय असतो 'डम्प मंथ'? या महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट हिट होत नाहीत असाही एक समज आहे. मागील वर्षात प्रदर्शित न झालेले चित्रपट आता काढून टाकावे, जसे तसे त्याचे प्रदर्शन व्हावे असे गृहित धरून चित्रपट प्रदर्शित केले जातात. केवळ दोन महिन्यापुरती ही संकल्पना नाही तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांना देखील 'डम्प मंथ' मानले जाते.गैरसमजाची पंरपरा बदलणार आता हा समज बदलायला लागला आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभाला डम्प मंथ या संकल्पनेला तडा दिला जात आहे. 2016 साली जानेवारी महिन्यात काही नावाजलेले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या मालिकेत आघाडीवर असलेला 'वझिर' या चित्रपटाविषयी बॉलिवूडला मोठी उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाच्या कलावंताबद्दल सांगायचे झाले तर अमिताभचा खास चाहता वर्ग व प्रयोगात्मक क लावंत म्हणून ख्याती मिळविणारा फरहान अख्तर यांची जोडी एकत्र येत आहे. जानेवारीतच अक्षय कुमारचा 'एअरलिफ्ट' व शबाना आझमी, जुही चावलाचा 'चॉक एन डस्टर' हा देखील पड्यावर येणार आहे.अशी होणार सुरुवातजानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच १ जानेवारीला रामगोपाल वर्माचा 'वीरप्पन' बॉक्स ऑफिसवर झळकेल. दुसर्या आठवड्यात 'वझिर' व बिकास मिश्रा यांचा 'चौरंगा' हे चित्रपट प्रदर्शित होतील. यांच्या पाठोपाठ सनी देओलचा 'घायल वन्स अगेन' हा चित्रपट प्रदर्शित होईल. याच वेळी शबाना आझमी, जुही चावला व दिव्या दत्ताच्या मुख्य भूमिकेचा व शिक्षणातील प्रयोगात्मक विषयावर आधारित 'चॉक एन डस्टर' प्रदर्शित होईल. एवढेच नव्हे तर अक्षय कुमारचा 'एअरलिफ्ट' देखील या स्पर्धेत उतरणार आहे. जानेवारी महिन्यात सिने रसिकांना चांगलीच मेजवानी मिळणार आहे एवढे नक्की. मागील वर्षी 'बेबी' व 'हॉलिडे' हे अक्षयचे चित्रपट चारही आठवडे चांगले कमाई करणारे ठरले होते.स्पर्धा मोठी असेलकेवळ प्रयोगात्मक चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत आहेत असा विचार करू नका. कारण ही स्पर्धा आणखी मोठी आहे. अमिताभ, फरहान, अक्षय, जुही, शबाना यांच्या चित्रपटांशिवाय याच 'दुर्दैवी' मानल्या जाणार्या जानेवारी महिन्यात तुषार कपूर, आफताभ शिवदासानी यांचा 'क्या कूल है हम' व हॉट सनी लिओनीचा 'मस्तीजादे' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. याशिवाय आर. माधवन अभिनित स्पोर्टड्रामा 'साला खडूस' देखील या स्पर्धेतील मजा वाढविणार आहे. जानेवारी महिना कमनशिबी असल्याचा दावा खोडत जुही चावला म्हणाली, हा काहीच विषय नाही. माझा 'फिर भी दिल है हिंदुस्थानी' हा चित्रपट जानेवारीमध्येच प्रदर्शित झाला आणि तो चांगला चालला.