जपानच्या एका थिएटरला लागले टाळे, शेवटचा चित्रपट दाखवला हा भारतीय सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 05:29 PM2020-03-04T17:29:42+5:302020-03-04T17:30:29+5:30

जपानमधील ओसाका येथील एक थिएटर बंद झाले असून तिथे शेवटचा हा भारतीय सिनेमा दाखवला. हा शो हाऊसफुल होता.

Japan theatre screens Aamir Khan's 3 Idiots as its last film before shutting down Tjl | जपानच्या एका थिएटरला लागले टाळे, शेवटचा चित्रपट दाखवला हा भारतीय सिनेमा

जपानच्या एका थिएटरला लागले टाळे, शेवटचा चित्रपट दाखवला हा भारतीय सिनेमा

googlenewsNext

राजकुमार हिराणी दिग्दर्शित ३ इडियट्स चित्रपट एका दशकापूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २५ डिसेंबर, २००९ साली भारतात रिलीज झाला आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. या चित्रपटाने भारतीयांनाच नाही तर परदेशातल्या लोकांनाही भुरळ पाडली आहे. हा चित्रपट ताइवान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, चीन व जपानमध्ये रिलीज केला होता.


जपानमधील ओसाका इथल्या थिएटर कायम स्वरूपी बंद केले जात होते आणि या त्यांनी शेवटचा चित्रपट म्हणून थ्री इडियट्स दाखवण्याचा निर्णय घेतला होता. या शोच्या प्रदर्शनावेळी थिएटर हाऊसफुल होते. यावरून स्पष्ट होते की हा चित्रपट सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावित करणाऱ्या सिनेमांपैकी एक आहे जो जगभरातल्या लोकांच्या आवडीचा आहे.


थिएटर आयोजकांनी ट्विटरवर ही माहिती देत लिहिले की, शेवटचा शो फ्युज लाइन सिनेमाजमधील.


३ इडियट्स चित्रपट परदेशातील ४१५ स्क्रीन्सवर आणि देशभरात १८०० स्क्रीन्सवर दाखवण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगली दाद दिली होती. भारतीय सिनेमाच्या इतिहासात हा चित्रपट सर्वात मोठी ओपनिंग करण्यात यशस्वी ठरला होता. 


३ इडियट्स चित्रपट २०१३ साली जपानमध्ये प्रदर्शित केला होता आणि इतक्या वर्षांनंतरही हा चित्रपट जपानमध्ये हाऊसफुल होता.
३ इडियट्स चित्रपट २५ डिसेंबर, २००९ साली भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटात आमीर खान व करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. या दोघांव्यतिरिक्त शर्मन जोशी, आर माधवन, बोमण इराणी मुख्य भूमिकेत होते.

Web Title: Japan theatre screens Aamir Khan's 3 Idiots as its last film before shutting down Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.