देशातील झुंडबळीच्या (मॉब लिंचिंग) वाढत्या घटना पाहून विविध क्षेत्रातील 49 दिग्गजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली. पण दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एक उपरोधिक ट्विट करून या पत्रातील हवाच काढून घेतली. त्यांचे हे ट्विट पाहून जावेद अख्तर जाम भडकले. त्यांनी शेखर कपूर यांच्या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला. इतकेच नाही तर त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्लाही दिला.
शेखर कपूरवर भडकले जावेद अख्तर; म्हणाले, जा मानसोपचार तज्ज्ञाला दाखवा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 1:52 PM
देशातील झुंडबळीच्या घटना रोखण्यासाठी विविध क्षेत्रातील ४९ दिग्गज व्यक्तींनी पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. यानंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एक उपरोधिक ट्विट केले आहे.
ठळक मुद्देतुम्ही स्वत:ला भारतीय नाही तर निर्वासित समजता का? तुम्हाला कुठे निर्वासितासारखे वाटणार नाही,पाकिस्तानात ? हा मेलोड्रामा बंद करा,’ असेही त्यांनी सुनावले.