ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) अनेक विधानांमुळे चर्चेत असतात. फिल्म आणि सामाजिक मुद्द्यांवर ते मत मांडत असतात. 'मी नास्तिक मुस्लिम' हे त्यांचं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच चर्चेत होतं. आता युनिफॉर्म सिविल कोडवर त्यांनी मांडलेलं मत व्हायरल होत आहे. याचं समर्थन करताना ते म्हणाले की केवळ कोणाची निंदा करायची म्हणून हे लागू करु नका असं ते म्हणाले. लोक मुस्लिमांवर जळतात कारण ते चार लग्न करु शकतात असंही ते मस्करीत म्हणाले.
एका पॉडकास्टमध्ये जावेद अख्तर म्हणाले, "UCC बिल केवळ मुस्लिमांवर निंदा करण्यासाठी लावू नका. हा नियम चुकीचा आहे. केंद्राने चर्चा करुन याला समान रुपात लागू केलं पाहिजे. मी या नियमाचं पालन करतो पण मुस्लिम एकापेक्षा जास्त लग्न करतात केवळ हीच गोष्ट पाहून हा कायदा लागू करणं चूक ठरेल." ते पुढे गंमतीत म्हणाले, 'मुस्लिमांना ४ लग्न करण्याचा अधिकार आहे यावर लोक जळतात. त्यांना बाकी काहीच चुकीचं वाटत नाही. जर इतर लोकांनाही हाच अधिकार दिला तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नसेल.'
ते पुढे म्हणाले,'हिंदू बेकायदेशीरपणे एकापेक्षा अधिक लग्न करत आहेत. आकडे पाहिले तर अधिक हिंदू दोन लग्न करत आहेत. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे.'
युनिफॉर्म सिव्हिल कोड
'युनिफॉर्म सिविल कोड' म्हणजेच समान नागरी संहिता म्हणजेच देशातील सर्व धर्म, समुदायांसाठी समान कायदा होय. केंद्राने या कायद्याचा प्रस्ताव ठेवला असून सध्या याची देशात जोरदार चर्चा आहे.