करण जोहरचा (Karan Johar) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. करण ७ वर्षांनंतर सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमातील स्टारकास्टही तेवढीच तगडी आहे. आलिया भट (Alia Bhat) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्या मुख्य भूमिका आहेत. सोबतच बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकारही यामध्ये भाव खाऊन जात आहेत. हँडसम अभिनेते धर्मेंद्र, अभिनेत्री जया बच्चन आणि शबाना आजमी यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. इतकंच नाही तर शबाना आजमी (Shabana Azmi) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांचा एक किसींग सीनही आहे. या सीनवर जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी काय प्रतिक्रिया दिली वाचा
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा शबाना आणि धर्मेंद्र यांचाच किसींग सीन जास्त चर्चेत आहे. तसंच त्यांची लव्हस्टोरीही खूपच गोड अंदाजात दाखवली आहे. दरम्यान यावर जावेद अख्तर यांनी काय प्रतिक्रिया दिली याचा खुलासा शबाना आजमी यांनी झूमला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्या म्हणाल्या, 'ओह, त्यांना काहीच वाटलं नाही. पण त्यांना माझं राऊडी काम खटकलं. संपूर्ण सिनेमात मी टाळ्या वाजवते, शिट्ट्या वाजवते. उत्साह वाढवत आहे आणि ओरडतही आहे. त्यांना असं झालं की मी माझ्या बाजूला बसलेल्या महिलेला ओळखत नाही. मी खूप वेड्यासारखी उत्साही झाले होते.'
त्या पुढे म्हणाल्या, 'या सीननंतर इतका हंगामा होईल हा मी विचारच केला नव्हता. त्या सीनवेळी लोकं हसतात आणि ओरडतात. शूटिंगवेळी हा अजिबातच मुख्य मुद्दा नव्हता. हे खरंय मी याआधी स्क्रीनवर जास्त किसींग सीन दिलेले नाहीत. पण धर्मेंद्र यांच्यासारख्या हँडसम अभिनेत्याला कोणाला नाही किस करावं वाटणार.'
शबाना आजमी यांनी दिलेली ही प्रतिक्रिया सध्या तुफान व्हायरल होत आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाने जोरदार कलेक्शन केले आहे. चारच दिवसात चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमवला. सध्या संपूर्ण फिल्मइंडस्ट्री सिनेमाचं कौतुक करत आहे.